“जलसंपदा विभागाचं मोहित कंबोजशिवाय पानही हलत नाही”; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

Ambadas Danve On Mohit Kamboj | विधान परिषदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यातील जलसंपदा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी जलसंपदाचा विभागाचा कुठलाही निर्णय मोहित कंबोज यांना विचारल्याशिवाय होत नाही असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत सरकारवर निशाणा साधला. ग्रामीण भागाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणाऱ्या जलसंपदा आणि जलसंधारण खात्यात एखादा अधिकाऱ्याला फोन केला तर त्यावर निर्णय मोहित कंबोज घेतात, असा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी केला.
जलसंपदा विभागातील बड्या अधिकाऱ्याशी मोहित कंबोज यांचे कनेक्शन असून या दोघांचे संभाषण सरकारने तपासावे, त्यांच्यावर सीडीआर तपासा. राज्यातील जलसंपदा विभागात मोहित कंबोज यांच्याशिवाय पानही हलत नाही. जलसंपदाचा विभागाचा कुठलाही निर्णय मोहित कंबोज यांना विचारल्याशिवाय होत नाही, असे दानवे यांनी म्हंटले आहे.
पुढे दानवे म्हणाले की, “आज जलसंपदा विभागात एखाद्या अधिकाऱ्याला फोन केला तर निर्णय मोहित कंबोज घेतो. दीपक कपूर नावाचे अधिकारी मोहित कंबोजला विचारल्याशिवाय पाणीही पित नाहीत. मोहित कंबोज यांना विचारल्याशिवाय जलसंपदा विभागात पानसुद्धा हलत नाही. हा मोहित कंबोज कोण आहे, ग्रामीण भागातील मोठमोठ्या धरणाचे प्रश्न, पाटबंधारे, पाण्याचा प्रश्न असतील त्याचे निर्णय मोहित कंबोज घेतात. याची चौकशी व्हायला हवी. मी पुरावे देईन, मोहित कंबोज जलसंपदा विभाग चालवतात.”
Ambadas Danve On Mohit Kamboj |
प्रसाद लाड आणि दानवेंमध्ये वाद
यावेळी मोहित कंबोज यांचं नाव घेतल्यानंतर भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी दानवेंच्या भाषणात सभागृहात असं नाव घेऊ शकत नाही म्हटलं. त्यावर दानवे यांनी, “माझ्याकडे पुरावा आहे म्हणून बोलतो, मला पुरावे मागतील त्यांना देईन, तुम्ही पुरावे मागणारे कोण, माझे भाषण रोखण्याची तुम्हाला कुणी परवानगी दिली, मोहित कंबोजचं नाव का घेऊ शकत नाही, तो तुमचा जावई आहे का? असा सवालही केला. Ambadas Danve On Mohit Kamboj |
“माझा बोलण्याचा अधिकार आहे. कुठल्याही मंत्र्यावर माझा आरोप नाही. मी त्या विभागाच्या कारभारावर बोललो आहे. या प्रकाराची चौकशी सरकारने करावी. मी बोलतोय ते जबाबदारीने बोलतोय. एखादे मंत्री, अधिकारी बोलतात हे समजू शकतो, पण मोहित कंबोज कोण आहे? त्याचा संबंध काय, माझ्या भाषणावर आक्षेप घेण्याचं कारण नाही,” असंही अंबादास दानवे यांनी म्हटलं.
हेही वाचा:
Pune : पोलीस दलात लवकरच मोठे बदल?; आयुक्तालयाने सादर केला शासनाला प्रस्ताव





