शंकरराव उरसळ फार्मसी विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या खराडी येथील शंकरराव उरसळ फार्मासुटिकल सायन्सेस व रिसर्च सेंटर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. फार्मसी अभ्यासक्रमाच्या अंतर्गत बी फार्मसी विभागाच्या मे 2024 या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला, यामध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले.
अंतिम वर्ष बी फार्म मध्ये प्रथम क्रमांक बावधने नीलम सी. जी. पी. ए. 8.44, द्वितीय क्रमांक होळकर निकिता सी. जी. पी. ए. 8.35 व तृतीय क्रमांक सावंत आरती सी. जी. पी. ए. 8.34 या विद्यार्थिनींनी मिळविला. महाविद्यालयाच्या बी फार्म विभागाचा निकाल उत्कृष्ट असून अंतिम वर्ष बी फार्मचा सरासरी निकाल 95.83% आहे. या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी महाविद्यालयाच्या सर्व शिक्षकांनी उत्तम असे मार्गदर्शन केले, तसेच गुणवत्ता वाढीसाठी आणि कौशल्य विकासासाठी विविध विषयांच्या तज्ञ मार्गदर्शकाची व्याख्याने महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात येतात अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मा.व्यवस्थापन सदस्य आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक भोसले यांनी सांगितली.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा श्री अजित दादा पवार, उपाध्यक्ष श्री राजेंद्र घाडगे, मानद सचिव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य अॅड. श्री संदीप कदम, खजिनदार श्री मोहनराव देशमुख, उपसचिव श्री एल. एम. पवार व श्री ए. एम. जाधव सहसचिव (प्रशासकीय) यांच्याकडून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व महाविद्यालयातील सर्व शिक्षकांचे कौतुक करण्यात आले.





