शेन वाॅर्न करत आहे सॅनिटायझरचे उत्पादन
Updated On:
मेलबर्न : जगभरात 2 लाखांच्या जवळपास कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्याच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत. त्यातच ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न देखील मागे नाही.
त्याने आपल्या डिस्टलरी नावाच्या कंपनीत मद्य (दारू) बनविणे थांबवले असून आता तज्ज्ञांची मदत घेत तो कोरोना बाधितांना सॅनिटायझर तयार करण्याच्या कामात व्यस्त झाला आहे.
कोरोनाची लागण जवळपास 2 लाखांपेक्षाही जास्त व्यक्तींना झाल्याचे उघड झाले तेव्हापासूनच वॉर्नने आपल्या कंपनीत मद्य (दारू) तयार करणे थांबवले आहे.





