शमिता शेट्टीला नेटकऱ्यांनी सुनावले; राष्ट्रगीतदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल
Shamita Shetty | देशभरात स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. अनेक सेलिब्रिटींनीही या खास दिवसाचा उत्सव साजरा केला. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री शमिता शेट्टीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. राष्ट्रगीतादरम्यान शमिताच्या देहबोलीमुळे अनेकजण तिच्यावर नाराज आहेत. यावरून सोशल मीडियावर शमिताला ट्रोल केले जात आहे.
व्हिडीओमध्ये राज कुंद्रा, त्याची दोन लहान मुलं आणि शिल्पाची बहीण शमिता शेट्टी दिसत आहे. राष्ट्रगीत सुरू असताना सर्वच जण सावधान उभे राहून ध्वजाला मानवंदना देत होते. पण त्यावेळी शमिता शेट्टीची कृती, तिचं वर्तन पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रगीत सुरू असताना ती अतिशय कॅज्युअल पोझिशनमध्ये होती. यावरून नेटकऱ्यांनी तिला चांगलेच खडसावले आहे. Shamita Shetty |
View this post on Instagram
नेटकऱ्यांनी केले ट्रोल
‘राष्ट्रगीत सुरू असताना कसं उभं रहायचं असतं ? शमिताला प्रोटोकॉल माहीत नाहीत का? ‘अशी कमेंट एकाने केली. ‘त्या लहान मुलीला (शिल्पाची लेक) मोठ्यांपेक्षा जास्त मॅनर्स आहेत,’ ‘शमिता हे राष्ट्रगीत आहे, शरारा साँग नाही,’ असं म्हणत नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे. या व्हिडिओमुळे शमिता शेट्टीला ट्रोल केले जात आहे, तर शिल्पा शेट्टीच्या मुलीचे कौतुक होत आहे. Shamita Shetty |
हेही वाचा :





