Shaktipeeth Expressway : नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाच्या मार्गात बदल करण्यात आल्याने सोलापूर जिल्ह्यात राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. महामार्गाच्या संभाव्य मार्गाची आधीच माहिती मिळवून काही जणांनी मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी केल्याची चर्चा होती. मात्र मार्ग बदलल्यानंतर या व्यवहारांवर मोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे. (Shaktipeeth Expressway) या भागातून जाणार मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला हा महामार्ग उत्तर सोलापूर आणि सांगोला तालुक्यांतून जाण्याचा प्रस्ताव होता. या पार्श्वभूमीवर काही राजकीय व्यक्ती, अधिकारी आणि संबंधितांनी त्या परिसरात जमीन खरेदी केल्याचे बोलले जात होते. मात्र सरकारने नवा आराखडा निश्चित करत मार्ग बार्शी, माढा, पंढरपूर आणि माळशिरस या भागातून वळवला आहे. (Shaktipeeth Expressway) या बदलामुळे पूर्वी खरेदी केलेल्या जमिनींच्या किंमतीवर परिणाम झाला असून, अनेक व्यवहार अडचणीत आले आहेत. स्थानिक पातळीवर ‘इनसाइड माहिती’च्या आधारे जमीन खरेदी झाल्याच्या चर्चांना यामुळे पुन्हा उधाण आले आहे. दरम्यान, काही ठिकाणी जमिनींचा मोबदला वाढवण्यासाठी कागदोपत्री फळबागा, विहिरी किंवा इतर सुविधा दाखवल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. यामध्ये दलालांचे जाळे सक्रिय असल्याचीही चर्चा आहे. (Shaktipeeth Expressway) या संपूर्ण प्रकरणात बेनामी व्यवहार आणि संभाव्य गैरप्रकारांच्या चौकशीसाठी आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत काकासाहेब कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया देताना, “मार्ग बदलामुळे केवळ जमीन व्यवहारच नव्हे, तर प्रशासनातील अंतर्गत बाबीही समोर येत आहेत. चौकशीमध्ये नेमके कोण सहभागी आहेत, हे स्पष्ट होईल,” असे सांगितले. दरम्यान, या प्रकरणामुळे आगामी काळात मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, सोलापूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. (Shaktipeeth Expressway)