Shakira Indian concert : शकीराचा भारतातील कॉन्सर्ट रद्द; काय आहे नेमकं कारण?

Shakira Indian concert : ग्रॅमी पुरस्कार विजेती जागतिक पॉप गायिका शकीराचा भारतातील कॉन्सर्ट रद्द करण्यात आला आहे. इराण व इस्रायल यांच्यातील सध्याच्या संघर्षामुळे हा कॉन्सर्ट आयोजित केला जाणार नाही, अशी माहिती आयोजकांनी सोशल मीडियावर दिली आहे.
‘फिडिंग इंडिया कॉन्सर्ट’ उपक्रमाचा एक भाग म्हणून, Zomato आणि District यांच्या संयुक्त विद्यमाने शकीराच्या कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. हा कॉन्सर्ट १०-११ एप्रिल रोजी मुंबईत आणि १५ एप्रिल रोजी दिल्लीत होणार होता.
परंतु इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव हा कॉन्सर्ट होणार नाही. हा कार्यक्रम आता कधी होईल, याबाबत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, ज्यामुळे चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे. Shakira Indian concert
View this post on Instagram
आयोजक संस्था ‘District’ने इन्स्टाग्रामवर एक सविस्तर पोस्ट करत लिहिले की, “सध्याची जागतिक भू-राजकीय परिस्थिती आणि प्रादेशिक तणावामुळे, शकीराची ‘फिडिंग इंडिया’ हा कॉन्सर्ट पुढे ढकलण्यात आला आहे. आमचे चाहते, कलाकार आणि प्रोडक्शन टीम सुरक्षा व संरक्षण ही आमच्यासाठी सर्वात महत्वाचे आहे. Shakira Indian concert
‘District’ ने जाहीर केले की, ते नवीन तारखा लवकरच जाहीर करतील. शिवाय, ज्यांनी कोणी तिकिटे खरेदी केली आहेत, त्यांना तिकिटांचे पैसे परत मिळतील. ही रक्कम त्यांनी ज्या माध्यमातून भरली होती, त्याच माध्यमातून पूर्ण केली जाईल.
हेही वाचा :


