Shai Hope Century : डोळ्यांना संसर्ग असतानाही गॉगल लावून शतक; शाई होपने साकारली जिगरबाज खेळी

Shai Hope Century during NZ vs WI 1st Test Match : वेस्ट इंडिज संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे, जिथे टी-२० आणि एकदिवसीय मालिकेनंतर आता तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज शाई होपने एका अविस्मरणीय खेळीची नोंद केली आहे. डोळ्यांना संसर्ग झालेला असतानाही त्याने गॉगल लावून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि झुंजार शतक ठोकून चाहत्यांची मने जिंकली.
वेस्ट इंडिजच्या फलंदाजाची अविस्मरणीय खेळी –
क्राइस्टचर्चच्या हेगले ओव्हल मैदानावर झालेल्या या सामन्याच्या दुसऱ्या डावात न्यूझीलंडने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ५३१ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. मात्र, पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही वेस्ट इंडिजची सुरुवात निराशाजनक झाली आणि त्यांनी अवघ्या ७४ धावांत ४ विकेट्स गमावल्या.
SHAI HOPE – The lone warrior of Windies 🔥
– T20I Hundred vs 🇦🇺
– Test Hundred vs 🇮🇳 in India
– ODI Hundred vs 🇵🇰
– ODI Hundred vs 🇳🇿 in New Zealand
– Test Hundred vs 🇳🇿 in New Zealand
.
.
.
.#NZvWI #Shaihope #Cricket #TestCricket pic.twitter.com/uRHCO8OGhD— OneCricket (@OneCricketApp) December 5, 2025
अशा बिकट परिस्थितीत, चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या शाई होपने एक टोक सांभाळून ठेवले. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी डोळ्यांच्या संसर्गामुळे त्याला मैदानापासून दूर राहावे लागले होते. पण चौथ्या दिवशी संघाची वाईट अवस्था पाहून त्याने फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. तो चष्मा लावून क्रीजवर उतरला आणि संघासाठी मौल्यवान धावा जमवण्यात यशस्वी झाला.
शाई होपने १४ चौकार आणि १ षटकार यांच्या मदतीने केवळ १३९ चेंडूंमध्ये आपले कसोटी शतक पूर्ण केले. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक आहे. विशेष म्हणजे, त्याने याच सामन्याच्या पहिल्या डावातही १०७ चेंडूंमध्ये ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. मात्र, वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात केवळ १६७ धावांवरच गारद झाला होता.
हेही वाचा – AUS vs ENG : मार्नस लाबुशेन ठरला पिंक बॉलचा बादशहा! डे-नाईट टेस्टमध्ये ‘हा’ पराक्रम जगातील पहिलाच खेळाडू
शाई होपसाठी २०२५ हे वर्ष ठरले खास –
शाई होपसाठी २०२५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूपच यशस्वी ठरले आहे. या वर्षात त्याने अनेक संस्मरणीय खेळी केल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या याच दौऱ्यातील वनडे मालिकेतही त्याने एक शतक झळकावले होते. यापूर्वी त्याने भारत दौऱ्यावर एक कसोटी शतक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मध्येही शतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे. तसेच, त्याने पाकिस्तानविरुद्ध वनडेमध्येही शतक केले आहे. शे होपने २०२५ या वर्षात आतापर्यंत १६०० हून अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत.





