लेक सुहानाच्या पोस्टवर शाहरुख खानची कमेंट, खास रिअॅक्शन व्हायरल

Shah Rukh Khan | बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या ‘किंग’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात शाहरुखची लेक सुहाना देखील दिसणार आहे. नुकतंच सुहाना खानने एका नामांकित ब्रँडच्या जाहिरातीसाठी फोटोशूट केले आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावर तिने पोस्ट केले आहेत.
सुहानाचे हे नवीन फोटो पाहून शाहरुख खानला लेकीचं कौतुक वाटत आहे. त्याने तिच्या पोस्टवर ‘लुकिंग सो गूड’ अशी कमेंट केली आहे. सुहानानेही वडिलांनी केलेल्या कमेंटला उत्तर देत ‘लव्ह यू’ असं म्हटलं आहे. यासह सुहानाच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांनीही कमेंट करत तिचं कौतुक केले आहे. या फोटोंमध्ये ती स्पोर्ट्स वेअरमध्ये विविध पोज देताना दिसली.
View this post on Instagram
;
सुहानाने डिसेंबर 2023 मध्ये ‘द आर्चीज’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं, ज्याचं दिग्दर्शन जोया अख्तरने केलं होतं. आता ती लवकरच तिचे वडील शाहरुख खान यांच्यासोबत ‘किंग’ या चित्रपटात दिसणार आहे, ज्याचं दिग्दर्शन आता सिद्धार्थ आनंद करत आहेत. या चित्रपटातून ती पहिल्यांदाच तिच्या वडिलांसह काम करणार आहे, त्यामुळे बाप-लेकीची जोडी चित्रपटातून पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक असल्याचं दिसतं आहे. Shah Rukh Khan |
शाहरुख बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. शाहरुखसोबत त्याच्या मुलांनी सुद्धा या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची मुलगी सुहाना अभिनेत्री म्हणून काम करत आहे, तर मोठा मुलगा आर्यन खान लवकरच दिग्दर्शनामध्ये पदार्पण करणार आहे. Shah Rukh Khan |
हेही वाचा:
“पती ट्रम्पच्या बाजूने तर पत्नी मस्कच्या पाठीशी” ; ट्रम्प-मस्कच्या लढाईत अमेरिकेचे ‘पॉवर कपल’ अडकले





