Shahrukh Khan: ‘मन्नत’नंतर शाहरुख खानचं नवीन घर होणार साकार; जाणून घ्या नवीन घराची किंमत

Shahrukh Khan: बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानला लवकरच बांद्र्यात नवीन घर मिळवणार आहे. ‘मन्नत’ या प्रसिद्ध बंगल्यानंतर आता शाहरुखला कार्टर रोडवर समुद्रासमोर २,८०० चौरस फुटांचा ४ बीएचके फ्लॅट मिळणार आहे. हे घर त्याला त्याच्या पहिल्या घराच्या पुनर्बांधणीमुळे मिळणार आहे.
पहिलं घर आता नव्या रूपात
शाहरुखने लग्नानंतर मुंबईतील पहिलं घर श्री अमृत सोसायटीमध्ये घेतलं होतं. आता या सोसायटीचा पुनर्बांधणी प्रकल्प सुरू आहे. त्यामुळे शाहरुखला जुन्या घरापेक्षा खूप मोठं आणि आलिशान घर मिळणार आहे.
डेव्हलपर्सनुसार, नव्या इमारतीत ४ आणि ५ बीएचके फ्लॅट्स असतील. या प्रकल्पातून जवळपास १,५०० ते २,००० कोटींची कमाई होण्याची अपेक्षा आहे.
कार्टर रोडवरील सोसायटी
कार्टर रोडवरील या सोसायटीमध्ये आधी तीन विंग होत्या. आता पुनर्बांधणीनंतर सदस्यांना ४५% हिस्सा मिळेल आणि उरलेलं ५५% विक्रीसाठी ठेवण्यात येईल. नव्या फ्लॅट्सची किंमत सुमारे प्रति चौरस फूट १.५ लाख रुपये असू शकते.
शाहरुख सध्या कुठे राहतो?
सध्या शाहरुख आणि त्याचा परिवार पाली हिलमधल्या ‘पूजा कासा’ या ठिकाणी दोन डुप्लेक्स फ्लॅटमध्ये राहतो. तर पत्नी गौरी खानने स्टाफसाठी खार पश्चिमेत भाड्याने फ्लॅट घेतला आहे.
‘मन्नत’चं वैभव
शाहरुखचा प्रसिद्ध बंगला ‘मन्नत’ त्याने २००१ मध्ये घेतला होता. तेव्हा त्याची किंमत १३ कोटी रुपये होती. आज या बंगल्याची किंमत तब्बल २०० कोटींवर गेली आहे. सहा मजली, २७,००० चौरस फुटांचा हा बंगला समुद्रासमोर असून त्यात जिम, थिएटर, लायब्ररी, टेरेस आणि भव्य सजावट आहे.
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटपासून अवघ्या २ किमी आणि ‘मन्नत’पासून ३ किमी अंतरावर असलेलं हे नवं घर शाहरुखच्या मुंबईतील वैभवात अजून भर घालणार आहे.





