‘डर नही दहशत हूं…’; ‘किंग’चा दमदार प्रोमो रिलीज; शाहरुख खानचे चाहत्यांसाठी खास सरप्राइज

Shahrukh Khan | बॉलीवूडचा ‘किंग’ अर्थात शाहरुख खान आपला ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. जगभरातील चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यातच आता तिने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना सरप्राईज दिले आहे. शाहरुखने त्याच्या आगामी ‘किंग’ सिनेमाचा पहिला प्रोमो रिलीज केला आहे. ज्यात शाहरुखचा चित्रपटातील पहिला लुक दाखवण्यात आला आहे.
‘किती खून केले, आठवत नाही, लोक चांगले होते का वाईट, माहित नाही! पण त्यांच्या डोळ्यात दिसलं की, त्यांचा हा अखेरचा श्वास आहे आणि मी त्यामागचं कारण. जगाने मला एकच नाव दिलं ते म्हणजे किंग’, असा भन्नाट डायलॉग असलेला ‘किंग’ सिनेमाचा पहिला प्रोमो आऊट झाला आहे. तर ‘डर नही दहशत हू’, असा डायलॉग प्रोमोच्या शेवटी दिसतो.
View this post on Instagram
शाहरुख खानचा अॅक्शन अवतार आणि स्टायलिश लूक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. यात चाहत्यांनी एक खास गोष्ट नोंदवली की शाहरुख खानने किंग ऑफ हार्ट्स कार्डला हत्यारासारखं धरलेले दिसत आहेत. हे त्याचे खरे नाव किंग ऑफ हार्ट्स म्हणजे दिलाचा बादशहा याकडे लक्ष वेधत आहे. Shahrukh Khan |
प्रोमोमध्ये शाहरुखचा नवीन सिल्व्हर केसांचा लूक, इअररिंग्स आणि स्टायलिश अंदाज यापूर्वी कधीच पाहिला नाही, जो पूर्णपणे नवीन आणि वेगळा दिसत आहे. ‘पठाण’ फेम दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने ‘किंग’चं दिग्दर्शन केलं आहे. ‘किंग’ ही सिद्धार्थ आनंद यांची आतापर्यंतचा सर्वात मोठी आणि मसालेदार चित्रपट मानली जात आहे, जी त्यांच्या अॅक्शन कथानाला एका नव्या पातळीवर नेणारा ठरू शकतो.
‘किंग’ चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे, या सिनेमात शाहरुखसोबत त्याची लेक सुहाना खान, अर्शद वारसी, जयदीप अहलावत, दीपिका पादुकोण दिसणार आहे. या प्रोमोनंतर आता चाहते चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. Shahrukh Khan |
हेही वाचा:
राष्ट्रवादीच्या दोन बड्या मंत्र्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न? भाजपची नाशिकमध्ये मोठी राजकीय खेळी





