Kangana Ranaut : अभिनय क्षेत्रातून येण्यासाठी कलाकारांना खूप स्ट्रगल करावे लागते. स्ट्रगलचे दिवस खूप वाईट अनुभव देणारे असतात. सिनेमा इंडस्ट्रीत सक्सेस मिळवलेल्या कलाकारांनी मुलाखतींमधून स्ट्रगलचे दिवस सांगितले आहेत. नुकतेच एका कार्यक्रमात अभिनेत्री कंगणा रणाौत हिने तिने सक्सेसच्या अगोदरच्या स्ट्रगलच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देत महत्वाची गोष्ट सांगितली. सध्या कंगणा खासदार असून सिनेमापेक्षा राजकारणात जास्त सक्रिय आहे. कंगणा अनेकदा तिच्या विधानांमुळे सतत चर्चेत असते. तिने केलेल्या विधानांमुळे ती वादातही सापडते. अलिकडेच झालेल्या एका कार्यक्रमात तिने तिच्या स्वतःच्या संघर्षांची तुलना शाहरुख खानच्या संघर्षांशी केली. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात नवी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात कंगणा राणौतने तिच्या कारकीर्दीबद्दल सांगितले. “मला इतके यश का मिळाले? असे ते म्हणाले. गावातून येऊन मुख्य प्रवाहात इतके यश मिळवणारा दुसरे कोणीच नसेल.” “शाहरुख खान घ्या, तो दिल्लीचा आहे आणि त्याने कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण घेतले आहे. पण मी अशा गावाची (भांबळा) आहे, ज्याबद्दल कोणीही ऐकलेही नाही.” असे तिने सांगितले. कंगना राणौतचा जन्म २३ मार्च १९८६ रोजी हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील भांबला या छोट्या गावात झाला. तिची आई शाळेत शिक्षिका होती आणि तिचे वडील व्यवसाय करत होते. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यास तिच्या घराच्याच विरोध होता. पण विरोधानंतरही तिने दिल्ली गाठली आणि अभिनय क्षेत्राची सुरूवात नाटकात काम करून केली. तिला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला गँगस्टर या सिनेमाने. २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमातून पहिल्यांदाच कंगणाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारलेली होती. या सिनेमातून तिला मोठी प्रसिद्ध मिळाली. त्यानंतर आलेल्या अनेक सिनेमांमुळे तिची लोकप्रियता वाढत गेली. तिच्या सिनेमा कारकीर्दीत अनेक सिनेमे आहेत, पण तिच्या क्वीन या सिनेमात तिच्या करिअरला कलाटणी मिळवून दिली. या वर्षी कंगणा राणौतने ‘इमर्जन्सी’ हा सिनेमा केला, ज्यामध्ये तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती. या सिनेमाचे दिग्दर्शनही कंगणाने केले आहे. हेही वाचा : राहुल गांधींना मोठा दिलासा ; ‘त्या’ प्रकरणावरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने वाढवली