Deva Film : शाहिद, पूजाची केमेस्ट्री जुळली; कस आहे देवा सिनेमातल ‘भसड मचा’ साँग? तु्म्ही पाहिलतं का?

अभिनेता शाहिद कपूरचा बहुप्रतिक्षित देवा सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला. या टीजरला चाहत्यांनी चांगली पसंती दिली असून आता या सिनेमातील पहिल गाण रिलीज करण्यात आल आहे. देवा सिनेमाच्या टीजरमधील शाहिदचा लूक, त्याची अॅक्शन याला त्याच्या चाहत्यांनी पसंती दिली आहे. देवाच्या टीजरला काही वेळातच लाखोंच्या वर व्ह्यूज मिळाले आहेत. आता देवा सिनेमातील पहिल गाण आलं असून त्याला देखील चांगली पसंती मिळताना दिसत आहे.
देवा आला…भसड मजा असं या गाण्याचे नाव असून, यामध्ये अभिनेत्री पुजा हेगडे आणि शाहिद कपूर डान्स करताना दिसत आहे. हे एक पार्टी साँग असून या गाण्यात दोघांचीही केमेस्ट्री चांगलीच जूळून आली आहे. या गाण्याला मीका सिंग, विशाल शेखर आणि ज्योतिका तंगरी यांनी आवाज दिला आहे. विशाल मिश्रा यांनी हे गाण संगीतबद्ध केलं आहे. गाण्याचे लिरिक्स राज शेखर यांनी लिहिले आहेत.
हे गाण सोशल मीडिया प्लॅटफॅार्मवर प्रचंड व्हायरल झाल आहे. अनेकांनी या गाण्यावर कमेन्ट देखील केल्या आहेत. या गाण्यातील शाहिदची एनर्जी लाईक केली जात आहे. त्याचा पांढरा शर्ट लक्ष विधून घेत आहे. तर पूजाने देखील या गाण्यातून तिच्या डान्सची झलक दाखवून दिली आहे. यामुळे सध्या भसड मचा हे गाण सोशल मीडियावर चांगलच ट्रेन्ड केलं जात आहे.
शाहिदच्या ‘ग्रे’ शेड पात्रांना अधिक पसंती
मिळालेल्या माहितीनुसार, शाहिद कपूरचा देवा सिनेमा एका मल्लाळम सिनेमाचा रिमेक असल्याच बोलल जात आहे. शाहिदच्या ग्रे शेडला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली असल्याचे याअगोदर पाहिला मिळाले आहे. कबीर सिंग, हैदर या सिनेमांतील त्याच्या पात्रांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. देवा सिनेमाच्या टीजरवरून तरी अस दिसत आहे की यातील पात्रही ग्रे शेड स्वरुपाच असणार आहे. यामुळे देवा सिनेमा आणि त्यातला शाहिदचा अभिनय प्रेक्षकांना आवडतो यासाठी येत्या ३१ जानेवारीची वाट पाहावी लागेल.




