Coolie Rajanikant : रजनीकांतच्या कुलीमध्ये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री; टीमकडून आमिर, रणवीर सिंगच्या कॅमिओबाबत स्पष्टीकरण

साउथ सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘कुली’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज करत आहे. या चित्रपटाचे नाव जाहीर झाल्यापासून कुली चित्रपट चर्चेत आहे. रजनीकांत यांच्यासोबत कुलीमध्ये अनेकांच्या महत्वाच्या भूमिका असणार आहेत. आता या चित्रपटाच्या स्टारमध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.
ती अभिनेत्री म्हणजे पूजा हेगडे. ‘कुली’ चित्रपटात पूजा हेगडेच्या एन्ट्रीची माहिती निर्मात्यांनी दिली आहे. त्याची पहिली झलकही शेअर करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळण्यासोबतच लोकेश कनगराज यांनी चित्रपटाची कथाही लिहिली आहे. या चित्रपटात नागार्जुन, सत्यराज, श्रुती हसन आणि सौबिन शाहीर हे कलाकारही दिसणार आहेत.
निर्मात्यांनी पोस्टर रिलीज करून पूजाच्या एन्ट्रीबाबत माहिती देत तिचे टीममध्ये स्वागत केले. आता या चित्रपटात बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानही दिसणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. या चित्रपटात आमिरचा कॅमिओ असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, या बातम्या अफवा असल्याचे सांगितले जात आहे.
‘कुली’मध्ये शाहरुख खान किंवा रणवीर सिंग विशेष भूमिका साकारणार असल्याची बातमी आली होती. मात्र अशा बातम्या केवळ अफवा ठरल्या आहेत. कुली चित्रपट याच वर्षी थिएटर्समध्ये रिलीज करण्यात येणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही. ‘कुली’मध्ये पूजा हेगडेच्या एन्ट्रीवर यूजर्स आनंद व्यक्त करत आहेत. या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत.





