Cocktail 2 | अभिनेता शाहिद कपूरच्या ‘कॉकटेल २’ सिनेमाचं शूट दिल्लीत सुरु होणार होतं. मात्र ते आता स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीतील लाल किल्ल्याजवळच एका कारमध्ये स्फोट झाला आणि अनेक लोकांचा जीव गेला. या दु:खद घटनेनंतर आता सिनेमाचं शूटही स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी सिनेमाचं शूट परदेशात झालं. शाहिद, क्रिती आणि रश्मिका यांनी सिनेमाचं युरोप शेड्युल पूर्ण केलं होतं. तिघांचे युरोपमधील काही फोटोही लीक झाले होते. त्यानंतर या महिन्यात सिनेमाची टीम दिल्ली येथे शूट करणार होती. दिल्लीतील प्रदूषण पाहता टीमने त्यासंदर्भातही सेटवर काळजी घेतली होती. ११ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबरपर्यंत दिल्ली आणि जवळपासच्या भागात सिनेमाचं शूट होणार होतं. आता ते ढकलण्यात असून परिस्थिती निवळल्यावर मेकर्स पुढील निर्णय घेणार आहेत. Cocktail 2 | कॉकटेल २ च्या निर्मात्यांनी सध्यातरी चित्रपटाच्या दुसऱ्या चित्रीकरण शेड्यूलला रद्द केले आहे. परिस्थिती शांत झाल्यावर याबाबत विचार केला जाईल. याशिवाय इतर अनेक अहवालांमध्ये असा दावा केला जात आहे की कॉकटेल २ चे निर्माते दिल्लीऐवजी दुसऱ्या शहराकडे वळू शकतात. Cocktail 2 | ‘कॉकटेल’ हा सिनेमा २०१२ साली आला होता. यामध्ये सैफ अली खान, दीपिका पादुकोण आणि डायना पेंटी होते. तिघांची केमिस्ट्री, सिनेमातील गाणी सगळंच खूप गाजलं. आता १३ वर्षांनी ‘कॉकटेल २’ची तयारी सुरु झाली आहे. दिग्दर्शक होमी अदाजानिया हेच दुसऱ्या भागाचंही दिग्दर्शन करणार आहेत. ‘कॉकटेल २’मध्ये शाहिद कपूर, कृती सेनन आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. Cocktail 2 | हेही वाचा: “अजित पवारांना आता मोदी, शाह आणि देवेंद्र फडणवीसही वाचवू शकणार नाही”; दमानियांचा थेट इशारा