शाहिद कपूर पापाराझींवर भडकला; नेटकरी म्हणाले ‘इतका अॅटिट्यूड…’

Shahid Kapoor Video| अभिनेता शाहिद कपूरच्या ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केल्यानंतर आता लवकरच शाहिद एका नव्या चित्रपटात दिसणार आहे. सध्या शाहिद ‘देवा’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून यातूनही तो कुटुंबासाठी वेळ देतो. नुकतेच शाहिद पत्नी मीरा राजपूतसोबत रोमँटिक डिनर डेटवर दिसला. मात्र, रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना शाहिद पापाराझींवर भडकल्याचे पाहायला मिळाले.
रेस्टॉरंटमधून बाहेर पडल्यानंतर पापाराझींनी शाहिद आणि मीराभोवती गराडा घातला होता आणि फोटो काढू लागले. ते पाहून शाहिद चांगलाच चिडला आणि फोटोग्राफर्सवर भडकला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शाहिद कपूरने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स घातली आहे, तर मीरा राजपूतनेही या आऊटिंगसाठी सुंदर काळा ड्रेस निवडला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की शाहिद कपूर पोज देण्यास नकार देतो आणि त्यांना रागावतो. यानंतर तो आपल्या कारमध्ये बसतो आणि निघून जातो. Shahid Kapoor Video|
View this post on Instagram
सध्या सोशल मीडियावर शाहिदचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी त्याचे हे वागणे पटलेले नाही. कबीर सिंगनंतर त्याच्या अॅटिट्यूडमध्ये बदल झाल्याचे एका नेटकऱ्यांने म्हटलं आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने इतका अॅटिट्यूड काय कामाचा म्हंटले आहे. दरम्यान, शाहिद ‘देवा’ चित्रपटात झळकणार आहे. यात त्याच्यासोबत अभिनेत्री पूजा हेगडे देखील मुख्यभूमिकेत पाहायला मिळणार आहे. Shahid Kapoor Video|
हेही वाचा:
विक्रांतच्या ‘द साबरमती रिपोर्ट’ची रिलीज डेट बदलली; ‘या’ दिवशी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला





