Shaheen Shah Afridi : शाहीन आफ्रिदीने मोडला शमीचा विक्रम, वनडेत असा पराक्रम करणारा ठरला पहिलाच गोलंदाज

Shaheen Shah Afridi Record : पाकिस्तान आणि वेस्टइंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना त्रिनिदाद येथे पार पडला. या सामन्यात पाकिस्ताने ५ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या सामन्यात शाहीनने ५१ धावा देऊन ४ विकेट्स घेत हा पराक्रम साधला.
शाहीनने मोडला शमीचा विक्रम –
या कामगिरीसह शाहीनने भारताच्या मोहम्मद शमीला मागे टाकले आहे. शाहीन आता कसोटी खेळणाऱ्या देशांमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी स्ट्राइक रेटसह १०० विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. विजडनच्या मते, शाहीनचा गोलंदाजी स्ट्राइक रेट आता २५.४ इतका आहे, तर शमीचा स्ट्राइक रेट २५.८ पेक्षा जास्त आहे. सध्या शाहीन हा एकमेव गोलंदाज आहे, ज्याचा सरासरी दर सामन्याला दोनपेक्षा जास्त विकेट्सचा आहे.
Shaheen Shah Afridi has 3️⃣5️⃣0️⃣ international wickets now. 🦅🔥🇵🇰#ShaheenShahAfridi #PAKvWI pic.twitter.com/NZUOLBJyL1
— Zain Zahid (@_ZainZahid) August 8, 2025
शाहीनच्या आकडेवारीने सर्वांनाच केले थक्क –
शाहीनच्या आकडेवारीने सर्वांनाच थक्क केले आहे. त्याने ६५ वनडे सामन्यांत १३१ विकेट्स घेतले आहेत. ६५ वनडे सामन्यांत त्याच्यापेक्षा जास्त विकेट्स कोणत्याही गोलंदाजाला घेता आलेले नाहीत. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्क आणि अफगाणिस्तानच्या राशिद खान यांच्या नावावर होता, ज्यांनी १२९-१२९ विकेट्स घेतले होते.
हेही वाचा – Shubman Gill Jersey : शुबमन गिलने कसोटी विक्रमासह जर्सी लिलावातही मारली बाजी! तब्बल ‘इतकी’ लागली बोली
स्टार्कला मागे टाकण्याची संधी –
सध्याच्या विक्रमासह शाहीन ६६ सामन्यांनंतरही हा विक्रम कायम ठेवेल. स्टार्कला मागे टाकण्यासाठी त्याला ६७ सामन्यांपूर्वी १३३ विकेट्सचा विक्रम मोडावा लागेल. जर शाहीन पुढील सामन्यात हे यश मिळवण्यात यशस्वी झाला, तर तो ६७ वनडे सामन्यांपूर्वी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरेल.





