स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात शहाबाज शरीफची फुशारकी ; भारताविरुद्ध बोलत म्हणाले,”४ दिवसांचे युद्ध…”

Shahbaz Sharif on India। ऑपरेशन सिंदूरमधील पराभवानंतरही पाकिस्तानचे शेपूट वाकडेच असल्याचे दिसत आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त आज पाकिस्तानच्या विजयाचे खोटे सूर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही गायले. त्यांनी, “चार दिवसांच्या संघर्षात पाकिस्तानने ऐतिहासिक विजय मिळवला. शाहबाज यांनी पाकिस्तानच्या जनतेला शुभेच्छा देण्यासाठी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
शाहबाज शरीफ यांनी आपल्या पोस्टमध्ये, “पाकिस्तानच्या स्वातंत्र्याला ७८ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मी देशाचे अभिनंदन करतो.” शाहबाज यांनी इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मी राष्ट्रपिता मोहम्मद अली जिना आणि अल्लामा मोहम्मद इक्बाल यांना श्रद्धांजली अर्पण करतो, ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील इतर नेते आणि कार्यकर्त्यांसह राष्ट्राला एका ध्येयाखाली एकत्र केले. त्यांच्या प्रयत्नांनी स्वतंत्र देश निर्माण करून इतिहासाचा मार्ग बदलला आणि अशा प्रकारे अशक्य वाटणारे स्वप्न साकार केले.”
भारतासोबतच्या संघर्षाबद्दल शाहबाज काय म्हणाले? Shahbaz Sharif on India।
शाहबाज भारताविरुद्ध मोठे खोटे बोलले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान झालेल्या संघर्षासाठी त्यांनी भारताला पूर्णपणे जबाबदार धरले. ते म्हणाले, “भारताने आपल्यावर युद्ध लादले होते, परंतु पाकिस्तानने त्यात ऐतिहासिक विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयाने आपल्या स्वातंत्र्याचे पावित्र्य तर मजबूत केलेच, पण आपल्या लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावनाही जागृत केली आहे, ज्यामुळे या स्वातंत्र्यदिनाचा अभिमान आणि उत्साह आणखी वाढला आहे.”
I extend my heartfelt felicitations to the nation on completion of 78 years of independence of Pakistan.
I pay tribute to Father of the Nation, Quaid-i-Azam Muhammad Ali Jinnah, and the Thinker of Pakistan, Allama Muhammad Iqbal, who along with other resolute leaders and…
— Shehbaz Sharif (@CMShehbaz) August 14, 2025
शाहबाज यांनी भारताविरुद्ध विष ओकले Shahbaz Sharif on India।
शहबाज म्हणाले, “अल्लाहच्या कृपेने, आपल्या शूर सैन्याने आपला अभिमान कायम ठेवला आणि शत्रूचा खोटा अभिमान मोडून काढला. आपले शूर सैनिक आणि हवाई दलाच्या योद्ध्यांनी शत्रूला गुडघे टेकण्यास भाग पाडले. आपल्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या शहीदांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो.”
ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानचा पराभव झाला
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरद्वारे बदला घेतला. या दरम्यान ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये शंभराहून अधिक दहशतवादी मारले गेले. यानंतर, पाकिस्तानी सैन्याने भारतीय शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय सैन्याने सर्व हल्ले हाणून पाडले. सैन्याने पाकिस्तानच्या लष्करी अड्ड्यांवरही प्रत्युत्तर दिले.





