Shahajibapu Patil : माजी आमदार शहाजी बापू पाटलांचे गाण्याच्या माध्यमातून कुणाल कामराला प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कविता केल्याने राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. या गाण्यामुळे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते त्यांनी यानंतर स्टुडिओची तोडफोड देखील केली. दरम्यान आता शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील (Shahajibapu Patil ) यांनीदेखील गाण्याच्या माध्यमातून कुणाल कामराला प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले शहाजी बापू पाटील?
कुणाल कामराच्या गाण्याला प्रत्युत्तर म्हणून ‘मातोश्री के अंगण मे कामरा आया सुपारी लेके गाना गाया, उद्धवजी को खुशी आया लेकीन ठाणे का टायगर आखो मे अंगार उबाठा को खत्म करणे महाराष्ट्र के मैदान में आया,’ असं गाणं शहाजी बापू पाटील यांनी म्हंटले आहे. दरम्यान कुणाल कामराच्या या विडंबनात्मक गाण्यामुळे राज्यातील 14 कोटी जनतेचं मन दुखावले आहे, त्यामुळे आपन सांगोला येथे कुणाल कामराच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे बापू यावेळी म्हणाले.
हे पण वाचा : तो पुन्हा येतोय! आक्षेपार्ह वक्तव्यानंतर रणवीर अलाहाबादियाचा पहिला व्हिडिओ आला समोर, म्हणाला…
तसेच महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्यात यावी, असा कायदा पारित व्हावा यासाठी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे असेदेखील बापू म्हणाले.
कोण आहेत शहाजी बापू पाटील?
शहाजीबापू पाटील हे सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार
विद्यार्थी दशेपासून शहाजी पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते
1985 साली त्यांनी दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवली
1985 च्या निवडणुकीत शहाजी पाटील यांचा पराभव
त्यानंतर झालेल्या निवडणुकीतही त्यांचा पराभवच झाला
1995 मध्ये शहाजी पाटील हे 192 मतांनी निवडून आले
त्यांनी 1995 ला गणपतराव देशमुख यांचा पराभव केला
त्यानंतर 1999, 2004, 2009 आणि 2014 पर्यंतच्या सर्व निवडणुकीत शहाजीबापूंचा पराभव झाला
2019 ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला
2019 ला गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव करत शहाजीबापू आमदार झाले.
2024 च्या निवडणुकीत शहाजी बापू पाटलांचा (Shahajibapu Patil ) डॉ. बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख यांच्याकडून पराभव





