क्रुझ ड्रग्ज प्रकरण : आर्यन खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Updated On:

मुंबई – क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतर सात आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आर्यन खानसह अन्य आरोपींची कोठडी संपणार असल्याने त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले.
यावेळी आर्यनच्या वकीलांनी पुन्हा एकदा जामीन याचिका दाखल केली होती. या सुनावणीवेळी न्यायालयात आर्यन खान तसेच एनसीबीच्या वकिलांची खडाजंगी रंगली. आर्यन खानच्या बाजूने ऍड. मानेशिंदे यांनी बाजू मांडली. तर एनसीबीच्या बाजूने एएसजी अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला. या वकिलांचा युक्तिवादानंतर न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा ठोठाविली.





