‘किंग’ चित्रपटामध्ये शाहरुख खान करणार ‘बाईक स्टंट’

‘डिंकी’नंतर शाहरुख खानचे सर्व चाहते त्याच्या पुढच्या चित्रपटाची वाट पाहत आहे. त्याच्या पुढच्या चित्रपटाचे नाव ‘किंग’ आहे, ज्यामध्ये त्याची लेक सुहाना खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुखही महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाबद्दल निर्मात्यांनी अद्याप काहीही सांगितले नसले तरी रिपोर्ट्सच्या माध्यमातून या चित्रपटाशी संबंधित काही अपडेट्स अनेकदा समोर येतात. आता या चित्रपटाबाबत एक नवीन फॅन थिअरी सोशल मीडियावर समोर आली आहे.
या चित्रपटात शाहरुख बाइक स्टंट करताना दिसणार असून त्या स्टंटमध्ये त्याच्यासोबत ३५ बाइकस्वार असतील अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. 16 जूनपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलमध्ये 22 दिवसांचे शूटिंग होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या बाबत त्याच्या टीमकडून कोणतीही माहिती अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही.
काही काळापूर्वी या चित्रपटात शाहरुख सुहानाच्या गुरूची भूमिका साकारणार असल्याची माहितीही समोर आली होती. या चित्रपटात शाहरुख कॅमिओ भूमिकेत दिसणार असल्याचं आधी बोललं जात होतं, पण नंतर तो कॅमिओमध्ये नाही तर मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं सांगण्यात आलं.





