Shah Rukh Khan : ‘डंकी’ सिनेमातील पाहिलं गाणं रिलीज; दिसला किंग खान आणि तापसी पन्नूचा रोमँटिक अंदाज

Shah Rukh Khan : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) आगामी ‘डंकी’ (Dunki) हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. शाहरुखच्या ‘पठाण’ आणि ‘जवान’ चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर तुफान कमाई केली.
त्यानंतर आता त्याच्या डंकी (Dunki) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे नवं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं होत. या पोस्टरमधून सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
भारताच्या एक दिवस आधी ‘डंकी’ (Dunki) परदेशातील चित्रपटगृहात धडकणार आहे. 22 डिसेंबर रोजी डंकी चित्रपट रिलीज होणार आहे. मात्र, अश्यातच, सिनेमातील पहिले गाणे रिलीज केले आहे.
या गाण्यात शाहरुख खानची रोमँटिक स्टाईल स्पष्टपणे दिसत आहे. हार्डी आणि मनूची प्रेमकहाणी यात दाखवण्यात आली आहे. हे गाणे प्रीतम यांनी संगीतबद्ध केले असून गायक अरिजित सिंग यांनी ते आपल्या हृदयस्पर्शी आवाजात गायले आहे.
गाण्याचे बोल स्वानंद किरकिरे आणि आयपी सिंग यांनी लिहिले आहेत. या गाण्यातील शाहरुख आणि तापसीच्या डान्स प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी कोरिओग्राफ केला आहेत. या चित्रपटात चार मित्रांची कथा आहे, ज्यांचे स्वप्न कसे तरी परदेशात पोहोचण्याचे आहे.
ही एक हृदयस्पर्शी कथा आहे जी त्यांची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी केलेल्या कठीण पण जीवन बदलून टाकणाऱ्या प्रवासाचे चित्रण करते. वास्तविक जीवनातून प्रेरणा घेऊन ‘डंकी’ ही प्रेम आणि मैत्रीची गाथा आहे जी वेगवेगळ्या कथांना एकत्र जोडते.
या चित्रपटात दिग्गज कलाकारांचा समूह आहे. ज्यामध्ये शाहरुख खान मुख्य अभिनेता असून त्याच्यासोबत बोमन इराणी, तापसी पन्नू, विक्की कौशल, विक्रम कोचर, अनिल ग्रोव्हर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.





