शाहरुख खानने सांगितले, ‘हॉलिवूड चित्रपट न करण्यामागचे खरे कारण…’

अबुधाबीमध्ये IIFA Awards 2024 चा भव्य कार्यक्रम सुरु झाला आहे. सर्वांच्या नजरा फक्त या मोठ्या कार्यक्रमाकडे लागल्या आहेत. यंदा हा अवार्ड शो शाहरुख खान होस्ट करत आहे. आता शाहरुख होस्ट आहे त्यामुळे मजा द्विगुणित होते. रेड कार्पेटवर मोठे स्टार्स दिसले, ज्यांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.
View this post on Instagram
या दरम्यान, शाहरुख खानने विकी कौशलसोबत डान्स केला आहे. या इव्हेंटमध्ये रेखा, विकी कौशल, अनन्या पांडे, क्रिती सेनन यांच्यासह अनेक स्टार्सनी आपल्या उत्कृष्ट परफॉर्मन्सने सर्वांचे लक्ष वेधले आहे. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले आहे. ‘पठाण’, ‘जवान’ यांसारख्या चित्रपटांतून त्याने आता एक वेगळीच मजल मारली आहे. पण शाहरुखने आयफाच्या मंचावर हॉलिवूडचे चित्रपट का करत नाही यामागचे कारण सांगितले आहे.
शाहरुख हॉलिवूड चित्रपट का करत नाही?
शाहरुख खान प्रत्येक वेळी आपल्या बुद्धीने सर्वांना प्रभावित करतो. किंग खानने सांगितले की तो हॉलिवूड चित्रपट करत नाही कारण तो स्वत:ला बाहेरचा माणूस समजतो. पुढे, शाहरुख विकीच्या दिशेने पाहतो आणि म्हणतो की मी इतर नेपो मुलांसारखा नाही, मी स्वतःला बाहेरचा माणूस समजतो. शाहरुखने विकीला इंडस्ट्रीचं मूलही म्हटलं. इतकंच नाही तर दोघांनी मिळून उत्कृष्ट डान्स परफॉर्मन्सही दिला. यादरम्यानच व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलच व्हायरल हतो आहे.
IIFA च्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलने शाहरुख-विक्कीचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघेही साउथ ब्लॉकबस्टर चित्रपट पुष्पा मधील ‘ओ अंतवा’ गाण्यावर स्फोटक स्टेप्स करताना दिसत आहेत. होस्ट म्हणून शाहरुख खान प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करताना दिसतो. स्टार्सचा शानदार परफॉर्मन्स लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.





