SRK New Stadium : किंग खानचा जागतिक क्रिकेटमध्ये डंका! उभारले स्वतःचे भव्य क्रिकेट स्टेडियम; लॉस एंजिल्स ऑलिम्पिकचे होणार सामने
SRK New Stadium : प्रदीर्घ काळापासूनचे आपले स्वप्न पूर्ण करत नाईट रायडर्स ग्रुपने अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील पोमोना येथे स्वतःच्या मालकीच्या भव्य क्रिकेट स्टेडियमचे अनावरण केले आहे.

Shah Rukh Khan Knight Riders Group KRG California Pomona Stadium Inauguration : बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान आणि त्याच्या नाईट रायडर्स समूहाने जागतिक क्रिकेटच्या नकाशावर एक नवा आणि सुवर्ण इतिहास रचला आहे. प्रदीर्घ काळापासूनचे आपले स्वप्न पूर्ण करत नाईट रायडर्स ग्रुपने अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील पोमोना येथे स्वतःच्या मालकीच्या भव्य क्रिकेट स्टेडियमचे अनावरण केले आहे. अमेरिकेत क्रिकेटचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या दृष्टीने हे स्टेडियम अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात असून, २०२८ मध्ये होणाऱ्या ऐतिहासिक लॉस एंजिल्स ऑलिम्पिक स्पर्धेतील (LA28 Olympics) क्रिकेटचे सामनेही याच मैदानावर खेळवले जाणार आहेत.
२१ मिलियन डॉलर्स खर्च; १० एकरवर उभारला क्रिकेटचा नवा गड –
या जागतिक दर्जाच्या स्टेडियमच्या उभारणीसाठी तब्बल २१ मिलियन डॉलर्स (सुमारे १७५ कोटींहून अधिक रुपये) खर्च करण्यात आले असून, हे स्टेडियम १० एकर परिसरामध्ये पसरलेले आहे. टेक्सासमधील ‘ग्रँड प्रॅअरी’ स्टेडियमनंतर अमेरिकेत फक्त क्रिकेट सामन्यांच्या आयोजनासाठी विशेषतः तयार करण्यात आलेले हे देशातील दुसरेच स्टेडियम ठरले आहे. पोमोनामधील फेअरप्लेक्स येथे उभारण्यात आलेल्या या मैदानावर ‘मेजर लीग क्रिकेट’ (MLC) स्पर्धेतील लॉस एंजिल्स नाईट रायडर्स संघाचे सर्व होम मॅचेस खेळवले जातील.
Shah Rukh Khan ❤️
Andhbhakts Nahi Manenge 😂 pic.twitter.com/qLgrfkVf5G
— POSITIVE FAN (@POSITIVEFANN) July 2, 2026
शाहरुख खान झाला भावूक; जय शाह यांचे मानले आभार –
What started as a dream… turns into reality today.
Welcoming you all to the Knight Riders Cricket Ground, LA.
A place built not just for sports but also entertainment and for families… and memories that last forever.
Special thanks to Jaybhai who has been too kind through… pic.twitter.com/5WEBSEHyOh
— Shah Rukh Khan (@iamsrk) July 1, 2026
स्वतःच्या हक्काचे स्टेडियम उभारल्यानंतर शाहरुख खानने सोशल मीडियावरून आनंद व्यक्त करताना म्हटले, “माझ्या स्वतःच्या संघाचे एक हक्काचे स्टेडियम असावे, हे अनेक वर्षांचे स्वप्न आज प्रत्यक्षात साकार झाले आहे. हा क्षण माझ्यासाठी अत्यंत भावूक करणार आहे. हे स्टेडियम केवळ क्रिकेटच्या सामन्यांसाठी मर्यादित न राहता मनोरंजनाचे एक मोठे केंद्र बनेल.” या स्टेडियमच्या उभारणीत मोलाचे सहकार्य केल्याबद्दल शाहरुखने आयसीसी (ICC) अध्यक्ष जय शाह आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजोग गुप्ता यांचे विशेष आभार मानले.
नाईट रायडर्स समूहाचा जागतिक क्रिकेटमध्ये मोठा दबदबा आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR), कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये त्रिनबागो नाईट रायडर्स (TKR), आयएलटी२० मध्ये अबू धाबी नाईट रायडर्स आणि मेजर लीग क्रिकेटमध्ये लॉस एंजिल्स नाईट रायडर्स अशा चार मोठ्या संघांची मालकी या समूहाकडे आहे.





