Shah rukh Khan: रिटायरमेंटचा सल्ला देणाऱ्याला किंग खानचं झणझणीत उत्तर, ट्रोलर गप्प !

Shah rukh Khan: बॉलीवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान गेल्या ३२ वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. दमदार अभिनय, व्यक्तिमत्त्व आणि विनोदबुद्धी यामुळे तो नेहमीच चर्चेत असतो. नुकतेच शाहरुखने त्याच्या एक्स हँडलवर #AskSRK हे सेशन घेतले. यात चाहत्यांनी त्याला विविध प्रश्न विचारले आणि अभिनेता नेहमीप्रमाणे मजेशीर उत्तरं देत होता.
रिटायरमेंटबाबतचा प्रश्न आणि शाहरुखचं उत्तर
या सेशनदरम्यान एका नेटकऱ्याने शाहरुखला “आता तुम्ही रिटायर व्हावं” असा सल्ला दिला. मात्र, किंग खानने त्याला आपल्या खास विनोदी अंदाजात झणझणीत उत्तर देत ट्रोलरची बोलती बंद केली.खरंतर, एका युजरने X वर लिहिले, “भाऊ, तू आता म्हातारा झाला आहेस, रिटायरमेंट घे आता, इतर मुलांना पुढे येऊ दे…” शाहरुखने त्यावर उत्तर दिले, “भाऊ, जेव्हा तुझ बालपण संपेल… तेव्हा काहीतरी चांगले विचार !”
राष्ट्रीय पुरस्काराबाबत प्रतिक्रिया
अॅटली दिग्दर्शित जवान चित्रपटातील अभिनयासाठी शाहरुख खानने नुकताच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे. एका चाहत्याने त्याला विचारले,
“राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर कसं वाटतं? राष्ट्रीय पुरस्कार की जनतेचं प्रेम कोणतं अधिक?”
यावर शाहरुखने दिलेलं उत्तर चाहत्यांच्या मनाला भिडलं. तो म्हणाला,
“वाह! मला देशाचा राजा असल्यासारखं वाटत आहे ! इतका सन्मान आणि जबाबदारी मिळाल्यानंतर पुढेही कठोर परिश्रम करून चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न करत राहीन.”
चाहत्यांचा उत्साह दुप्पट
या उत्तरांनंतर चाहत्यांनी शाहरुखच्या विनोदबुद्धी आणि सकारात्मक दृष्टिकोनाचं भरभरून कौतुक केलं. अभिनयासोबतच आपल्या चाहत्यांशी अशी मनमोकळी गप्पा मारणारा किंग खान हा खराच चाहत्यांच्या हृदयाचा बादशाह असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं.





