शाह मेहमूद कुरेशी निवडणूक लढवण्यास अपात्र

नवी दिल्ली – पाकिस्तान तेहरिक ए इन्साप पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना निवडणूक आयोगाने आगामी सार्वत्रिक निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले आहे.
कुरेशी यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने यापूर्वीच पेटाळून दिला होता. त्याविरोधात आयोगाच्या अपीलीय अधिकार् यांकडे कुरेशी यांनी दाद मागितली होती. त्यांनीही कुरेशी यांचा अर्ज नामंजूर केली आहे.
मुलतान हा कुरेशी यांचा बालेकिल्ला आहे. तेथूनच आगामी सार्वत्रिक निवडणूक लढवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. सिंध प्रांतातील उमरकोट येथून संसदेची निवडणूक लढवण्यास निवडणूक आयोगाने मंजूरी दिली होती. मात्र मुलतान येथील अन्य दोन जागा आणि पंजाब प्रांतातील विधानसभेच्या एका जागेवरून निवडणूक लढवण्यास आयोगाने कुरेशी यांना परवानगी नाकारली आहे. आयोगाच्या या निर्णयाविरोधात आयोगाच्या अपीलीय लवादानेही कुरेशी यांना ही परवानगी नाकारली आहे.





