इंदापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीचे वातावरण तापले असून, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हॉइस चेअरमन भरत शहा यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली आहे. त्यांच्या विजयासाठी आज (१ नोव्हेंबर) निरा-नरसिंहपूर येथील लक्ष्मी नरसिंह देवस्थानात विशेष अभिषेक आणि पूजन करण्यात आले. भरत शहा मित्र परिवाराच्या वतीने आयोजित या धार्मिक कार्यक्रमात शहरातील नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि शेकडो समर्थकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. भरत शहा यांच्या विक्रमी मतांनी विजयासाठी आणि इंदापूरमध्ये विकासाच्या नव्या युगाची सुरुवात व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना करण्यात आली. भरत शहा यांच्या कुटुंबातील अंकिता मुकुंद शहा या नगराध्यक्ष असताना इंदापूर नगरपरिषदेने सलग पाच वर्षे राष्ट्रीय स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत उत्तम कामगिरी केली होती. त्यावेळी अत्याधुनिक व्यापारी संकुल, नवीन नगरपरिषद भवन, सतत शुद्ध पाणीपुरवठा योजना, कचरामुक्त शहर उपक्रम, कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी नियुक्त्या, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज लाइन, ऑक्सिजन पार्क आणि बायोडायव्हर्सिटी प्रकल्पांतर्गत वृक्षारोपण अशी अनेक विकासकामे पूर्ण झाली होती. शहा परिवाराच्या या कामगिरीमुळे इंदापूरच्या विकासाची पायाभूत सुविधा मजबूत झाली असून, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे शहरवासीयांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भरत शहा यांच्या उमेदवारीला शहरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. कार्यक्रमात भरत शहा यांच्यासह मुकुंद शहा (शहा ग्लोबल स्कूलचे विश्वस्त), गणेश महाजन, अंगद शहा, प्रमोद राऊत, सुनील तळेकर, प्रशांत उंबरे, निवास माने, बापूराव जामदार, अजिंक्य जावीर, शुभम पवार, गौरव राऊत, प्रवीण हरणावळ, सोनू सय्यद, महेश पाटील, बापू अडसूळ, गोरख ढावरे, उमेश ढावरे, अभिजीत अवघडे, मनोज राजगुरू, पुंडा बानकर, बंडा चव्हाण, आदित्य बोराटे, शकील सय्यद, संतोष जाधव, अजिंक्य ढाणे, हर्षद सय्यद, ओंकार मोरे, अत्तर मोमीन, अक्षय सूर्यवंशी यांच्यासह शेकडो युवक उपस्थित होते.