IND vs ENG : ‘सचिन सरांच्या व्हिडीओंमुळे टीम इंडियात कमबॅक…’, शफालीची सचिनप्रेरित यशोगाथा, पाहा VIDEO

Shafali Verma’s Comeback in Team India : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू शफाली वर्माचे बऱ्याच कालावधीनंतर संघात पुनरागमन झाले आहे. आता इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी तिला भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. संघाबाहेर असताना सचिन तेंडूलकर सरांचे कसोटी क्रिकेटमधील फलंदाजीचे अनेक व्हिडियो पाहिले, ज्यामुळे प्रत्येक चेंडूला त्याच्या गुणवत्तेनूसारच खेळण्याचे महत्व समजल्याचे भारतीय महिला संघात पुनरागमन करणाऱ्या शफाली वर्माने सांगितले.
सचिन सरांच्या व्हिडीओंमुळे प्रेरणा मिळाली –
ऑक्टोबर महिन्यापासून खराब फॉर्ममुळे शफालीला संघातून वगळण्यात आले होते. आता बीसीसीयने शेयर केलेल्या व्हिडियोमध्ये शफाली म्हणाली की, ‘पूर्वी मी प्रत्येक चेंडूवर चौकार किंवा षटकार मारण्याचा विचार करायचे, पण नंतर मला समजले की चांगल्या चेंडूचा आदर करणे महत्त्वाचे आहे. मी सचिन सरांच्या अनेक कसोटी खेळी पाहिल्या आणि त्यातून खूप प्रेरणा मिळाली. यामुळे मला माझ्या बालपणीच्या दिवसांची आठवण झाली, जेव्हा मी त्यांचा एकही सामना चुकवत नव्हते. दरम्यानच्या काळात मी प्रत्येक सामना पुन्हा-पुन्हा पाहिला. तो पाहून मला कळले की चांगल्या चेंडूचा आदर करूनच चांगली फलंदाजी देखील करता येवू शकते.’
डब्ल्यूपीएलमधील कामगिरीच्या जोरावर संघात पुनरागमन –
Setbacks. Strength. Shafali 💪
⏳ Living in the present
🌟 Taking inspiration from the legendary @sachin_rt
🏡 Rebuilding with strength of familyHere’s Shafali Verma’s comeback story – by @jigsactin
Full interview 🎥🔽 #TeamIndia | #ENGvIND https://t.co/JWiDOaXPc2 pic.twitter.com/eSBkb35xQv
— BCCI Women (@BCCIWomen) June 28, 2025
शफालीने देशांतर्गत क्रिकेट आणि महिला प्रीमियर लीगमध्ये चमकदार कामगिरी करून संघात पुनरागमन केले. याबाबत बोलताना तिने सांगितले की, पुनरागमन करणे सोपे नव्हते. गेल्या वर्षी संघ निवडीच्या दहा दिवस आधी तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा ते आणखी कठीण झाले असल्याचे ती म्हणाली.
फिटनेसवर कठोर परिश्रम घेतले – शफाली वर्मा
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी शफालीला संघात स्थान मिळाले नाही. शफाली म्हणाली, “मी माझ्या फिटनेसवर कठोर परिश्रम केले. २०-२५ दिवसांनी मी बॅट उचलली तेव्हा खूप चांगले वाटले. त्यामुळे मला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळाली. वेळ खूप काही शिकवते. आता मी माझे सर्वोत्तम देईन आणि बाकीचे नशिबावर सोडेन.” भारत आणि इंग्लंड संघांतील पहिला टी-२० सामना आज नॉटिंगहॅम येथे खेळला जाणार आहे.





