Shabana Azmi: Pretty Little Baby! शबाना-जावेद यांचा Cute डान्स, पण चर्चेत ठरले डॉ. श्रीराम नेने

Shabana Azmi : बॉलीवूडची ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी १८ सप्टेंबर रोजी आपला ७५ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. या खास दिवसानिमित्त त्यांनी भव्य पार्टीचं आयोजन केलं होतं. माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर, रेखा, संजय कपूर, सोनु निगम, फराह खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.
या पार्टीतील व्हिडीओज् सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान हिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शबाना आझमी आणि त्यांचे पती जावेद अख्तर ‘Pretty Little Baby’ या इंग्रजी गाण्यावर रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत. या दोघांच्या केमिस्ट्रीचं चाहते कौतुक करत आहेत.
पार्टीत या जोडीने मॅचिंग कपडे घातले होते. डान्सदरम्यान उपस्थित पाहुण्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना चिअर केलं.
View this post on Instagram
यावेळी विशेष लक्ष वेधलं ते माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी. सुरुवातीला ते डान्सचा व्हिडिओ मोबाईलवर रेकॉर्ड करताना दिसले, पण योग्य अँगल मिळावा म्हणून ते संजय कपूरच्या बाजूला लॉनवर खाली बसले आणि तेथून व्हिडिओ शूट करू लागले. त्यांच्या या साधेपणाचं आणि उत्साहाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
डॉ. नेने यांना चाहत्यांकडून ‘बॉलीवूडचे जावई’ म्हटलं जातं. ते नेहमीच माधुरीसोबत फिल्मी पार्ट्या आणि कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतात.
फराह खानने व्हिडिओसोबत लिहिलं आहे, “शबाना आझमी, तुम्हाला ७५ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आणि जावेदजी नेहमी असेच तरुण राहा.”
हा व्हिडिओ पाहून नेटकरीही कौतुकाचा वर्षाव करत आहेत. शबाना आझमींच्या वाढदिवसाची पार्टी, त्यांचा रोमँटिक डान्स आणि डॉ. नेने यांचा साधेपणा, हे तिन्ही क्षण सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.





