लोणावळा : पवन मावळ विभागातील तिकोणापेठ येथे एका अल्पवयीन आदिवासी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने याबाबत लोणावळा ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी रमेश रामदास वाघमारे (रा. तिकोणापेठ, ता. मावळ, जि. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ५ मे ते १० मे दरम्यान घडली. आरोपीने पीडितेला आपल्या घरी बोलावून ती अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही तिच्यावर लैंगिक आहे अत्याचार केला. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम ६५ (१) आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ (पोक्सो कायदा) च्या कलम ४, ८, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे या करीत आहेत.