राज्यात यंदा कडाक्याची थंडी! दोन आठवडे आधीच सुरू होणार?

मुंबई : या वर्षी, हिवाळा सामान्यपेक्षा दोन आठवडे आधीच सुरू होऊ शकतो. त्याचा कालावधीही जास्त असेल. म्हणजे गंगेचा मैदानी प्रदेश आणि मध्य भारतात हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत राहू शकतो. हिवाळी महिन्यांत जागतिक हवामान सामान्यपेक्षा जास्त थंड असेल.
खरं तर, ला निना परिस्थिती विकसित होणार आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, येत्या हिवाळी हंगामात २०१० नंतरची सर्वात तीव्र थंडी जाणवू शकते.
या हिवाळ्याच्या हंगामात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो आणि सक्रिय पश्चिमी विक्षोभ वायू वायव्य भारतातील भागात जास्त प्रमाणात प्रभावित करतील. आयएमडीने देखील लवकरच ला निना परिस्थिती विकसित होण्याची पुष्टी केली आहे.
देशासह महाराष्ट्रातही कडाक्याची थंडी पडण्याची दाट चिन्हे आहेत. यंदा नियोजित वेळेच्या एक दिवस उशिरा म्हणजे १६ ऑक्टोबरला नैऋत्य मान्सून देशाबाहेर गेला. ईशान्य मान्सूनने तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, किनारी आंध्र, रायलसीमा, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि केरळ-माहे व्यापले. दक्षिण भारतात ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात ईशान्य मान्सून दरम्यान वार्षिक पर्जन्यमानाच्या ३० ते ६०% पाऊस पडतो.
ला-निनाची शक्यता ७१ टक्के
ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान ला निना परिस्थिती निर्माण होण्याची ७१% शक्यता आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान ला निना परिस्थितीची ५४% शक्यता आहे. यापूर्वी, जुलै २०२० ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत सलग ३२ महिने ला निना परिस्थिती होती.
तथापि, नोव्हेंबर २०२० ते जानेवारी २०२१ दरम्यान, समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा १.२ अंश कमी होते, त्यामुळे त्या वर्षी हिवाळा सामान्यपेक्षा जास्त थंड होता. २०२२ आणि २०२३ मध्येही थंडी होती. सप्टेंबर २०१७ ते मे २०१८ आणि पुन्हा जुलै १६ ते जानेवारी १७ पर्यंत ला निना परिस्थिती होती.





