Seva Sankalp Abhiyan : भाजपकडून 17 सप्टेंबरपासून देशव्यापी ‘सेवा संकल्प अभियान’; कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवणार
भाजप १७ सप्टेंबरपासून महिनाभर चालणारे देशव्यापी सेवा संकल्प अभियान (Seva Sankalp Abhiyan) राबवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव पक्ष अभियानाच्या माध्यमातून करेल.

Seva Sankalp Abhiyan : भाजप १७ सप्टेंबरपासून महिनाभर चालणारे देशव्यापी सेवा संकल्प अभियान (Seva Sankalp Abhiyan) राबवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव पक्ष अभियानाच्या माध्यमातून करेल. मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अभियानाचा प्रारंभ होईल.
भाजप मोदींच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी सेवा पंधरवड्याचे (Seva Sankalp Abhiyan) आयोजन करतो. आता गुजरात आणि केंद्र सरकारांचे प्रमुख म्हणून ते २५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहेत. ती उल्लेखनीय वाटचाल अधोरेखित करण्यासाठी भाजपने महिनाभर चालणारे अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविषयीची माहिती पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिली.
सेवेसाठी समर्पण मोदींच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे पक्षाचे अभियान समर्पित सेवेभोवती केंद्रित असेल, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले. अभियानावेळी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून भाजप युवक, महिला आणि शेतकऱ्यांसह समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहचेल. देशातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी पक्षाकडून त्यांचा सन्मान केला जाईल.
भाजप कार्यकर्त्यांच्या (Seva Sankalp Abhiyan) वतीने विशेष शिबिरांचे आयोजन केले जाईल. त्या शिबिरांमध्ये जनतेला केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशातून सहाय्य उपलब्ध होईल.






