Thailand Bangkok Fire: थायलंडमधे पबच्या भीषण आगीत २७ जणांचा होरपळून मृत्यू ; ६० जण गंभीर जखमी
Thailand Bangkok Fire: थायलंडची राजधानी बँकॉक काल एक भीषण अपघात घडला. एका पबला लागलेल्या आगीत २७ जणांचा मृत्यू झाला, तर ६० जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Thailand Bangkok Fire: थायलंडची राजधानी बँकॉक काल एक भीषण अपघात घडला. एका पबला लागलेल्या आगीत २७ जणांचा मृत्यू झाला, तर ६० जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शहराच्या उत्तर भागात असलेल्या एका पबमध्ये ही आग लागली. आग हळूहळू संपूर्ण इमारतीत पसरल्याने पब आणि इतर भागांमध्ये घबराट पसरली. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाची वाहने तात्काळ घटनास्थळी दाखल झाली.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर थायलंडचे पंतप्रधान अनुतिन चर्नविराकुल यांनी पबला भेट दिली आणि रुग्णालयात दाखल झालेल्यांशी संवाद साधला. ‘द गार्डियन’च्या वृत्तानुसार, पंतप्रधान चर्नविराकुल म्हणाले, “आग लागल्यानंतर पबमध्ये वेगाने धूर पसरला, त्यामुळे अनेक लोकांना जीव वाचवण्यासाठी पबच्या मागील बाजूस असलेल्या शौचालयांकडे धाव घ्यावी लागली. आम्ही २७ मृतदेह बाहेर काढले आहेत; उर्वरित लोकांना रुग्णालयात नेण्यात येत आहे.” Thailand Bangkok Fire:
बँकॉक महानगर प्रशासनाचे अधिकारी सुरियाचाई यांनी सांगितले की, या घटनेत जखमी झालेल्या इतर ६३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बँकॉकचे गव्हर्नर चाडचार्ट सिट्टीपंट यांनी सांगितले की, जखमी झालेल्या आणि रुग्णालयात दाखल असलेल्यांपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे.
Terrible News. Huge fire engulfed a pub in Bangkok early on Monday morning, killing 27 people before firefighters brought the blaze under control. Fire was reported around midnight. Footage shows huge blaze raging out of the front door of the pub. pic.twitter.com/iPQ4tZ3lcJ
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) July 12, 2026
सुरियाचाई यांनी सांगितले की, बचाव पथके घटनास्थळी पोहोचेपर्यंत आग संपूर्ण परिसरात पसरली होती. उत्तर बँकॉकच्या चाटुचक येथे असलेले ‘रॉंग बीअर ना लाट फ्राओ’ हे पब एक लोकप्रिय रेस्टॉरंट आणि मनोरंजनाचे ठिकाण आहे. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
थायलंडमध्ये यापूर्वीही अपघात Thailand Bangkok Fire:
आगीचे कारण अद्याप निश्चित झालेले नाही. तथापि, पोलीस आणि फॉरेन्सिक पथके तपास करत आहेत. थायलंडमध्ये यापूर्वीही आगीच्या घटना घडल्या आहेत. २०२२ मध्ये एका अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला होता.





