CJP Mumbai Protest: अभिजीत दिपकेंना झटका! सीजेपीच्या मुंबईतील आंदोलनाला ‘नो एन्ट्री’
CJP Mumbai Protest: पोलिसांनी नाकारली परवानगी; जाणून घ्या कारण...

CJP Mumbai Protest: निवडणूक आयोगाच्या विरोधात अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखालील सीजेपीने आंदोलनाचा एल्गार पुकारला होता. हे आंदोलन २ ऑक्टोबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात करण्यात येणार होते, त्यासाठी त्यांनी मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितली होती. परंतु शिवाजी पार्कवरील आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयोजकांनी २ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत शिवाजी पार्क मैदानावर शांततापूर्ण आंदोलन करण्यासाठी पोलिसांकडे रीतसर परवानगी मागितली होती. मात्र, शिवाजी पार्क पोलीस ठाण्याने विविध कायदेशीर आणि सुरक्षेच्या कारणास्तव ही परवानगी फेटाळून लावली आहे. शिवाजी पार्कऐवजी मुंबईतील दुसऱ्या मैदानावर आंदोलनाच्या परवानगीसाठी अर्ज करण्याची सूचना पोलिसांनी सीजेपीला केली आहे. CJP Mumbai Protest
न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट
शिवाजी पार्क हे क्रीडांगण असल्याने त्याचा वापर खेळाव्यतिरिक्त इतर कारणांसाठी किंवा राजकीय, सामाजिक सभा आंदोलनांसाठी करण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने कडक निर्बंध लादलेले आहेत. न्यायालयाच्या याच नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
याशिवाय दादरसारख्या गजबजलेल्या भागात आंदोलन झाल्यास मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते. तसेच, ऐन सणासुदीच्या आणि सुट्टीच्या दिवशी ध्वनी प्रदूषणाचा धोका निर्माण होऊन स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागू शकतो, असे म्हणत मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. CJP Mumbai Protest
हेही वाचा:





