दाखले देण्यासाठी स्वतंत्र कक्षाची उभारणी करा
Updated On:

नगर – राज्य सरकारने लाडकी बहिण योजनेची नुकतीच घोषणा जाहीर केली असून आज या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. योजनेच्या कागदपत्रांसाठी महिलांनी तलाठी कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. लाडकी बहिण योजनेसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे रवी दंडी यांनी केली आहे.
या योजनेचे १ जुलै ते १५ जुलै या वेळेत ऑनलाइन अर्ज भरणे सुरू आहे. तलाठी कार्यालयात उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला देण्यासाठी एकच कर्मचारी असल्याने नागरिकांना दाखला मिळण्यासाठी विलंब होत आहे. तलाठी कार्यालयात कर्मचारी संख्या वाढवावी. शैक्षणिक प्रवेशा करिता विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.





