पुणे जिल्हा | रेशनकार्ड व महाऑनलाइनचे सर्व्हर ठप्प

शिरूर, {अरुणकुमार मोटे} – शिरूर तालुक्यातील पुरवठा विभागातील शिधापत्रिका ऑनलाइन करणारे सर्व्हर बऱ्याच दिवसापासून संथगतीने सुरु आहे. तसेच वेळोवेळी बंद होत असल्याने लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन शिधापत्रिका मिळत नसल्याने महिलांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. शिरूर पुरवठा विभागात मोठी गर्दी होत असून नवीन ऑनलाइन शिधापत्रिका नागरीकांना वेळेवर मिळत नाही. त्यामुळे पुरवठा विभागात वाद होत आहे.
महा-ई सेवा सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांत विद्यार्थी आणि लाभार्थ्यांची अपलोड केलेली हजारो प्रमाणपत्रे महा ऑनलाइनचे सर्व्हर ठप्प झाल्यामुळे गेल्या महिनाभरापासून अडकून पडली आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल लागताच पुढील प्रवेशासाठी अत्यावश्यक प्रमाणपत्र काढण्यासाठी महा-ई-सेवा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्रात अर्ज दाखल केले होते.
ते येण्याची वाट पाहत असताना शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित केली. त्यात पहिल्या घोषणेनुसार उत्पत्र रहिवासी अधिवास प्रमाणपत्र आदीची आवश्यकता असल्याचे नमूद केल्यामुळे हजारो महिलांनी राज्यात अर्ज दाखल केले त्यामुळे सर्व्हरवर लोड देऊन तहसीलच्या ऑनलाइन डेस्क क्रमांक एकवरून संचिका पुढे जाणे थांबून गेले आहे.
नोकरभरती, शैक्षणिक प्रवेशाला मोठा अडथळा लाड़की बहीण’ योजनेचे निकष नंतर बदलून ३१ ऑगस्ट ही अर्ज दाखल करुण्याची अंतिम तारीख घोषित केली. अगोदर दाखल केलेल्या ऑनलाइन अर्जामुळे अनेक नोकरभरती आणि दहावी, बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मुदतीच्या आत प्रमाणपत्रे न मिळाल्यामुळे शैक्षणिक प्रवेशापासून बाधित राहू शकतात.
सध्या पोलीस भरती सुरू आहे. कागदपत्रे वेळेवर न मिळाल्यामुळे करिअर वाया जाण्याची भीती तरुणांकडून व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी शासनाचे प्रमाणपत्र देण्याची सात दिवसांची मुदत उलटून गेल्यामुळे अर्ज दाखल केलेले अर्जदार आणि महा-ई-सेवा केंद्रचालक यांच्यात चकमक होत आहेत. केंद्रचालकदेखील हताश झाले आहेत.
पोलीस भरतीच्या जागा निघाल्यामुळे गेल्या महिन्यात ‘ईएसबीशी प्रमाणपत्रासाठी महा-ई-सेवा केंद्रात अर्ज दाखल केला होता. मात्र, शासनाने ते प्रमाणपत्र रद्द करून नव्याने सुधारित प्रमाणपत्र काढण्याचा आदेश दिला आहे. परंतू वेळोवेळी सर्व्हर डाऊन असल्याने दाखला वेळेत मिळत नाही. – सोनाली दौंडे, विद्यार्थीनी.





