Nagar | चिकणी व निमगाव भोजापूरसाठी स्वतंत्र तलाठी कार्यालय

संगमनेर, (प्रतिनिधी) – आमदार बाळासाहेब थोरात यांनी महसूल मंत्रीपदाच्या काळामध्ये अनेक ऐतिहासिक निर्णय या खात्याला लोकाभिमुख बनवले.
तालुक्यांमध्ये अद्यावत नऊ तलाठी कार्यालय उभारण्याबरोबरच महसूल कामकाजाच्या सोयीसाठी चिकणी व निमगाव भोजापूरकरिता स्वतंत्र सजा मंजूर करून या गावाला तलाठी कार्यालय दिले असल्याचे प्रतिपादन आमदार सत्यजित तांबे यांनी केले.
चिकणी येथे नवीन तलाठी कार्यालयाचा शुभारंभ आमदार सत्यजित तांबे यांच्याहस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कॉ. कारभारी उगले, दूध संघाचे संचालक विलासराव वर्पे, भारत वर्पे, किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आनंद वर्पे,
सरपंच गायत्री माळी, उपसरपंच चंद्रभान मुटकुळे, राजेंद्र चांगदेव वर्पे, दत्त वर्पे, माधव वर्पे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व चिकणी युवक काँग्रेसचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.




