परदेशातील अघोषित मालमत्ता शोधण्यासाठी वेगळा विभाग
Updated On:

नवी दिल्ली – परदेशातील अघोषित मालमत्तांचा तपास करण्यासाठी प्राप्तिकर खात्यामध्ये एक वेगळा विभाग स्थापन करण्यात आला आहे. यामध्ये 69 अधिकारी कार्यरत राहणार आहेत. देशभरातील प्राप्तिकर खात्याच्या 14 कार्यालयांमध्ये हे विभाग कार्यरत राहतील.
या विभागांना धाडीचे व जप्तीचे अधिकार देण्यात आले असून यामुळे परदेशात काळा पैसा ठेवण्याला आळा बसेल असे सरकारला वाटते.
भारतीयांनी परदेशात साठवलेला काळा पैसा शोधून काढण्याची मोहीम केंद्र सरकारने हाती घेतली असून यासाठी विविध देशाबरोबर माहितीच्या देवाण-घेवाणीचे करार करण्यात आले आहेत. आता प्राप्तिकर विभागातील अधिकारी या काळा पैश्यांकडे लक्ष देणार आहेत.





