Shiv Sena Leader : शिवसेनेला मोठा धक्का! ‘या’ तडफदार नेत्याचे निधन; १५ दिवसांत कुटुंबावर दुःखाचा दुसरा आघात
Shiv Sena Leader : शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण (वय ६४) यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

Shiv Sena Leader : शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण (वय ६४) यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. (Shiv Sena Leader)
शिवसेनेत विविध महत्त्वाच्या पदांवर काम
शिरीष चव्हाण यांनी शिवसेनेचे वसई तालुकाप्रमुख म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. राजकीय कारकिर्दीत त्यांनी नालासोपारा नगरपरिषदेचे नगरसेवक म्हणून काम केले. त्यानंतर वसई-विरार शहर महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर पहिल्याच कार्यकाळात ते शिवसेनेचे गटनेते होते. पुढे त्यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारीही सांभाळली. (Shiv Sena Leader)
१५ दिवसांत कुटुंबावर दुसरा आघात
चव्हाण कुटुंबावर अवघ्या १५ दिवसांत दुःखाचा दुसरा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मातोश्रींचेही पंधरा दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर आता शिरीष चव्हाण यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा मोठा आघात झाला आहे. (Shiv Sena Leader)
त्यांच्या निधनाबद्दल माजी आमदार हितेंद्र ठाकूर, महापौर अजीव पाटील आणि शिवसेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख प्रथमेश राऊत यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनाने परिसरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. (Shiv Sena Leader)
Shiv Sena Leader : शिवसेनेच्या तडफदार नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा





