ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Senior astronomer Jayant Narlikar passes away : पुण्यातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. जेष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले आहे. पहाटे झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने भारतीय आणि आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक समुदायात शोककळा पसरली आहे. आंतररष्ट्रीय स्तरावर खगोल शास्त्राज्ञ म्हणून ज्यांचा अधिकार मान्य झाला होता, असे जयंत नारळीकर तेवढ्याच रसाळ भाषेत मराठी विज्ञानकथा लिहण्यासाठी देखील लोकप्रिय होते. भारताचे आजचे खगोलशास्त्राचे जे संशोधन आणि प्रगती झाली आहे, त्यामध्ये जयंत नारळीकर यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे.
जयंत नारळीकर यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूरमध्ये झाला. त्यांचे वडील बनारस हिंदू विद्यापीठात शास्त्रज्ञ होते. जयंत नारळीकर यांचे शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठात झाले. पुढील शिक्षणासाठी ते केंब्रिजला केले. बीए, एमए आणि पीएचडी पदवी त्यांनी मिळवली. याशिवाय रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे त्यांनी पटकावली.
टाटा मूलभूत संशोधन संस्थेत त्यांनी काम केले. त्यानंतर आयुक्त संस्थेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. २०२१ मध्ये नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमलेनाचे ते अध्यक्ष होते. फ्रेड हॉईल हे जयंत नारळीकर यांचे गुरु होते. जगाची निर्मिती स्फोटातून झाली आहे, या थिअरवर त्यांनी टीका केली होती. यामुळे हॉईन-नारळीकर ही थिअरी त्याकाळी प्रसिद्ध झाली होती. या थिअरीचे दोघेही टीकाकार होते. १९७२ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी नारळीकर यांना बोलावून घेतले. त्यानंतर जयंत नारळीकर टीआयएफआरमध्ये दाखल झाले.
जयंत नारळीकर यांची पुस्तके
अंतराळातील भस्मासूर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, चला जाऊ अवकाश सफरीला, टाइम मशीनची किमया, प्रेषित, यक्षांची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत न आला, व्हायरस.
विज्ञानविषयक पुस्तके
अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते, गणितातील गमतीजमती, नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर), नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान, विश्वाची रचना, विज्ञान आणि वैज्ञानिक, विज्ञानगंगेची अवखळ वळणे, विज्ञानाची गरुडझेप, विज्ञानाचे रचयिते, सूर्याचा प्रकोप, चार नगरांतले माझे विश्व (आत्मचरित्र).
विविध पुरस्काराने सन्मान
२००४ मध्ये पद्मविभूषण
२०१० मध्ये महाराष्ट्र भूषण
२०१४ मध्ये साहित्य अकादमी





