Chandrakant Patil : स्वबळाचा नारा की युती? पुण्यातील बैठकीत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टचं सांगितलं म्हणाले….

Chandrakant Patil : स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकीचे बिगुल येत्या काही महिन्यात वाजणार आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयार केली जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुणे महापालिकेची निवडणूक महत्वाची मानली जात आहे. महापालिकेवर पुन्हा एकदा भाजपचा महापौर बसविण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते ज्यावेळी पुण्यात आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांना दिली आहे.
तसेच कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच तयारीला लागण्याचे आवाहन देखील त्यांनी केले होते. नुकतीच महापालिकेच्या निवडणुकी संदर्भात राज्याचे तंत्र शिक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी कसब्यात कार्यकर्त्यांसमेवत एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वूर्ण सूचना केल्या आहेत. या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार की युती करणार यावर भाष्य केले आहे.
यंदाची निवडणूक स्वबळावर लढण्याच्या शक्यतेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले याबाबत कार्यकर्त्यांनी काळजी करू नये. ‘युतीचा निर्णय हा आपल्या पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. आपले काम आहे जनतेच्या मनात स्थान निर्माण करणे आणि पक्षाला विजयी करणे’. त्यांनी नमूद केले. त्यांनी केलेल्या विधानावर निवडणकीच्या दृष्टीने तयारीला लागण्याचा संदेश त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना दिला आहे.
यंदाची निवडणूक भाजपसाठी महत्वाची असून, गेल्या निवडणुकीत पक्षाने चांगली कामगिरी केली होती. या निवडणुकीत त्याहून मोठे यश मिळण्याचे उद्दिष्ठ आहे, असे पाटील यावेळी बोलताना म्हणाले. प्रत्येक कार्यकर्त्याने गटागटाने कामाला लागावे आणि घरोघरी जाऊन पक्षाच्या योजना आणि कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच आतापासूनच मेहनत घेतली तर पुण्यात ऐतिहासिक विजय नक्की मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.





