nagar | शुभम वाघमारे यांची पुरवठा निरीक्षकपदी निवड

पारनेर, (प्रतिनिधी) – अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत शुभम संजय वाघमारे यांची पुरवठा निरीक्षकपदी निवड झाली आहे. शुभम हा पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे यांचा मुलगा तर पत्रकार विजय वाघमारे यांचा पुतण्या आहे.
संरक्षण शास्त्र (डिफेन्स सायन्स), तत्वज्ञान (फिलोसॉफी) या विषयात शुभम पहिल्याच प्रयत्नात नेट आणि सेट परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे. उत्तर कोरियातील विद्यापीठाने शुभमला फेलोशिप प्रदान केली होती.
शुभमच्या यशाबद्दल खासदार नीलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, नगराध्यक्ष नितीन अडसुळ, उपनगराध्यक्ष जायदा शेख, प्राचार्य गीताराम म्हस्के, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे, दिनेश औटी, शिक्षक नेते रा.या.औटी, माजी उपनराध्यक्षा सुरेखा भालेकर, वसंत चेडे, अशोक चेडे, नंदकुमार दरेकर, दिलीप भालेकर, विठ्ठल औटी, संजय देशमुख, बापूसाहेब हांडे यांनी अभिनंदन केले आहे.





