Pune Gramin: कुबेर पतसंस्थेच्या चेअरमन पदी प्रकाश हरगुडे यांची निवड
Updated On:

वाघोली : केसनंद तालुका हवेली येथील कुबेर पतसंस्थेचे चेअरमन पदी प्रकाश पांडुरंग हरगुडे पाटील तर व्हाईस चेअरमन चैताली गणेश हरगुडे यांची बिनविरोध निवड झाली असून निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदन त्यांच्यावर वर्षाव होत आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा संचालकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच मिलिंद हरगुडे, संस्थापक रमेश हरगुडे, माजी व्हा. चेअरमन विजय हरगुडे, संचालक तानाजी हरगुडे, शिवाजी पाटोळे, गुलाब हरगुडे, निलेश ढोरे, गुलाब मोरे, अनिकेत कोल्हे, रहीम शेख, सुरेखा हरगुडे, रविंद्र बांगर, ओमकार हरगुडे, संकेत हरगुडे, निवडणुक अधिकारी एस एस मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.





