सामाजिक न्याय विभागाच्या इंदापूर तालुका उपाध्यक्षपदी पांडुरंग मोहिते यांची निवड

इंदापूर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या मान्यतेने इंदापूर तालुका सामाजिक न्याय विभागाच्या उपाध्यक्षपदी रेडा (ता.इंदापूर) येथील युवा नेते पांडुरंग राजेंद्र मोहिते यांची निवड नियुक्तीचे पत्र देत खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवार (दि.२८) रोजी केली.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे इंदापूर तालुका उपाध्यक्ष पांडुरंग मोहिते म्हणाले की, गोरगरीब, शेतकरी, उपेक्षित, घटकांना न्याय देण्याची भूमिका फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष अध्यक्ष शरद पवार साहेबच करू शकतात. त्यामुळे इंदापूर तालुक्यात सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून प्रत्येक घरातील युवक शरद पवार यांच्या विचारांचा पोहचवला जाईल. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांना इंदापूर तालुक्यातून लोकसभेसाठी अधिकचे मतदान घडवले, जाईल अशी ग्वाही सामाजिक न्याय विभागाचे तालुका उपाध्यक्ष पांडुरंग मोहिते यांनी दिली.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ, तालुका अध्यक्ष एडवोकेट तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील तसेच सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संजय दुपारगुडे, युवक नेते अमोल मुळे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





