‘जय भवानी गड विकास प्रतिष्ठान’च्या २० विद्यार्थ्यांची आठवी शिष्यवृत्ती परीक्षा जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये निवड

इंदापूर : लाखेवाडी येथील प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल व विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये वीस विद्यार्थ्यांची निवड झाली त्या सर्व यशस्वी विद्यार्थी व पालकांचा सन्मान संस्थेच्या वतीने यावेळी करण्यात आला.
नुकताच शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यामध्ये प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल मधील एकूण 24 विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते त्यापैकी 24 विद्यार्थी पात्र ठरले व 100% निकाल लागला व 24 पैकी 13 विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले तसेच विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील इयत्ता आठवी मधील 43 विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते त्यापैकी 36 विद्यार्थी पात्र ठरले व 83.72% निकाल लागला व 36 पैकी सात विद्यार्थ्यांची जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये निवड झाली. इंदापूर तालुक्यातून इयत्ता आठवी मध्ये जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये 92 विद्यार्थ्यांची निवड झाली त्यामधील 20 विद्यार्थी हे जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मधून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. या गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांचा शॉल ,श्रीफळ ट्रॉफी देऊन त्यांना गौरविण्यात आले व त्यांचा सन्मान करण्यात आला.
शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांना ज्योती भोसले, शिवकुमार कुदळे ,कल्पना मोरे, कविता आवटे, सागर डोईफोडे, प्रवीण शिंदे ,श्रीमंत गुरव, प्रियांका खाडे, निशा घाडगे, प्रियांका यादव, अश्विनी मोरे, ज्योती वाघमारे ,तेजस्विनी पाटील या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आपला भारत देश उज्वल व विकसित करण्यासाठी आपल्या देशाला ,आपल्या समाजाला एका चांगल्या अधिकाऱ्याची ,चांगल्या नेतृत्वाची आवश्यकता असते .त्यासाठी विद्यार्थ्यांना बालवयापासूनच मेहनत करावी लागते. त्याची पूर्वतयारी ही स्पर्धा परीक्षापासून सुरू करावी लागते. त्याचा पाया त्याची सुरुवात स्कॉलरशिप परीक्षेपासून होते. या स्पर्धा परीक्षांमध्ये पात्र होण्यासाठी इयत्ता पहिली पासून मंथन परीक्षा ,एम. टी .एस. परीक्षा यांचा सराव करून घेतला जातो. व या अभ्यासक्रमाची सांगड आपल्या शालेय अभ्यासक्रमाशी घालून आपल्या प्रशालेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. असे मत संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी मांडले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले, संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले, संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे, संस्थेचे प्रमुख सल्लागार व माजी गटशिक्षणाधिकारी प्रदीप, संस्थेचे विश्वस्थ ऋषिकेश ढोले , विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चे मुख्याध्यापक गणेश पवार ,फार्मसी कॉलेजचे प्राचार्य खेडकर, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य राजेंद्र सरगर ,सर्व सुपरवायझर, शिक्षक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमंत गुरव यांनी केले.





