वाहतुकीस अडथळा ठरणारी भंगार वाहने करणार जप्त
Updated On:

नगर – वाहतुकीस अडथळा ठरणारी शहरातील रस्त्यालगत असणारे नादुरुस्त, भंगार वाहने जप्त करण्याची मोहिम महापालिकेचा अतिक्रण विभाग हाती घेणार असून, नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
शहरात अनेक ठिकांणी रस्त्यालगत जुनी, भंगार, ना दुरुस्त वाहने वर्षानुवर्ष रस्त्यालत पडुन आहेत. त्यामुळे रहदारीस सातत्याने अडथळा होत आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. तसेच काही ठिकांणी रस्त्यालगतच बांधकामाचे साहित्य टाकण्याचा प्रकार सध्या सुरु आहे.
अशा सर्व प्रकारच्या अतिक्रमणावर मनपाचा अतिक्रमण विभाग कारवाई साठी सज्ज झाला आहे. संबंधितांनी रस्त्याच्या कडेला असलेली वाहने स्वतःहून हटवित अन्यथा मनपा ही वाहने जप्त करेल असा इशारा अतिक्रमण विभागाने दिला आहे.





