Seema Kanyal Big Claims : ‘टीम इंडियाचा विवाहित लेग स्पिनर मेसेज-फोटो पाठवायचा अन्…’, सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचा मोठा दावा

Seema Kanyal Big Claims Indian Cricket Team Leg Spinner Messaged : सोशल मीडियावर एका व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे, ज्यामध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सीमा कन्याल दावा करत आहेत की भारतीय क्रिकेट संघाचा एक लेग स्पिनर तिला त्याचे सेल्फी पाठवत असे. केवळ सेल्फीच नाही तर हा क्रिकेटपटू सीमाला डायरेक्ट मेसेज (DM) देखील पाठवत असे. तिने सांगितले की हे सुमारे ६-७ महिने चालू राहिले, परंतु सीमा कन्यालने त्या क्रिकेटपटूचे नाव उघड केले नाही.
सीमा कन्यालचा भरतीय लेग-स्पिनर मोठा खुलासा
खरं तर सीमा कन्याल नुकतीच एका पॉडकास्टवर मुलाखत देण्यासाठी आली होती. तिने भारतीय लेग-स्पिनरचे नाव उघड करण्यास नकार दिला. परंतु मुलाखतीच्या होस्टला तो विवाहित असल्याचे पुष्टी देऊन आश्चर्यचकित केले. ती म्हणाली, “मी शूटिंगवर होते. घरी आल्यावर मला दर २ तासांनी ३-४ मेसेज येत होते. मला वाटते की स्वाभिमान नावाचीही एक गोष्ट असते. हा खेळाडू भारतीय क्रिकेट संघाकडून खेळत आहे, पण स्टॉक करणे ही चांगली गोष्ट नाही.”
सोशल मीडियावर लावले जात आहेत वेगवेगळे अंदाज –
View this post on Instagram
सीमा कन्यालने सांगितले की हे सुमारे ६-७ महिने चालू होते. सीमाने पॉडकास्टमध्ये त्या क्रिकेटपटूचे नाव उघड केले नाही. मात्र, या व्हिडीओनंतर क्रिकेटप्रेमींमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हा लेग-स्पिनर नक्की कोण आहे? हे सर्वांना जाणून घ्यायचे आहे. सीमाच्या या खुलाशानंतर सोशल मीडियावर विविध अंदाज बांधले जात आहेत. लोक वेगवेगळ्या भारतीय लेग स्पिनरवर संशय व्यक्त करत आहेत. पण सीमाने अजून कोणाचेही नाव घेतलेले नाही. येत्या काळात याबद्दल आणखी काय माहिती समोर येते, हे पाहणे बाकी आहे. या प्रकरणाची इंटरनेटवर बरीच चर्चा होत आहे.
सीमा कन्यालबद्दल बोलायचे झाले, तर ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती वेळोवेळी तिच्या प्रवासाचे आणि वेगवेगळ्या सुंदर पोशाखांमधील फोटो शेअर करत राहते. इन्स्टाग्रामवर पाच लाखांहून अधिक लोक तिला फॉलो करतात. बरं, सध्या भारतात २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल २०२५ च्या तयारीचे वातावरण आहे.





