औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेत आणखी वाढ; नागपूर दंगलीनंतर विशेष खबरदारी
Updated On:

छत्रपती संभाजीनगर – नागपूर येथील हिंसाचारानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादे येथील औरंगजेबाच्या कबरीला कडेकोट बंदोबस्त पुरवण्यात आला आहे. या कबरीकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग केली आहे.
या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचीही तपासणी केली जात आहे. सद्यस्थितीत या ठिकाणी 1 उपविभागीय पोलिस अधिकारी, 3 पोलिस निरीक्षक, 1 एसआरपीएफची तुकडी, साध्या वेशातील पोलिस, 120 हून अधिक होमगार्ड जवान व स्थानिक पोलिस ठाण्याचे सर्व कर्मचारी तैनात करण्यात आलेत. यामुळे कबर परिसराला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.





