Mehbooba Mufti : भारत-पाकिस्तानमध्ये गुप्त चर्चा सुरू.! मेहबुबा मुफ्ती यांचा दावा
भारत आणि पाकिस्तानमध्ये चर्चा होण्याची गरज जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी व्यक्त केली.

Mehbooba Mufti –भारत आणि पाकिस्तानमध्ये चर्चा होण्याची गरज जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी व्यक्त केली. त्याचवेळी दोन्ही देशांमध्ये गुप्त चर्चा सुरू असल्याचा सनसनाटी दावाही त्यांनी केला.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आणखी ताणले गेले. त्या नापाक कृत्याचा हिशेब चुकता करण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवले.
त्या लष्करी मोहिमेने पाकिस्तानची दाणादाण उडवली. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील चर्चाप्रक्रिया ठप्प झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर, पूॅंचमधील मेळाव्यात बोलताना मेहबुबा यांनी भुवया उंचावणारे वक्तव्य केले.
ऑपरेशन सिंदूरविषयी आग्रहाने बोलले जाते. मात्र, मागील ३ महिन्यांपासून दोन्ही देशांत पडद्यामागून चर्चा सुरू आहेत. निवृत्त राजनैतिक आणि लष्करी अधिकारी यांच्याबरोबरच इतरही परदेशी जातात.
तिथे ते पाकिस्तानी प्रतिनिधींशी चर्चा करतात, असे त्या म्हणाल्या. जम्मू-काश्मीर मुद्द्यावर चर्चेशिवाय तोडगा निघणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
मेहबुबा या जम्मू-काश्मीरमधील महत्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे त्यांच्या दाव्याची व्यापक स्तरावरून दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. तसेच, राजकीय पडसादही उमटण्याची चिन्हे आहेत.





