दुसरा टप्पा : महाराष्ट्रातील 10 मतदारसंघातील प्रचार संपला
Updated On:
मुंबई – देशात नव्याने अस्तित्वात येणाऱ्या 17 व्या लोकसभेसाठी गुरुवार, 18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. निवडणूकीसाठी 48 तासांपूर्वी म्हणजे आज सायंकाळी 6 च्या सुमारास प्रचार संपला. राज्यात दुसऱ्या टप्प्यामध्ये दहा मतदारसंघामध्ये लोकसभेचे मतदान होणार आहे.
महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर येथील मतदारसंघात निवडणूक होणार आहे.





