ओझर : आज मंगळवार दि ३० रोजी सकाळी मांजरवाडी येथे खंडागळे मळ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे यांच्या घरासमोरील लावलेल्या पिंजऱ्यात दुसरी बिबट मादी जेरबंद झाली आहे. काल सोमवार दिनांक २९ रोजी सकाळी साधारण एक ते दीड वर्ष वय असणारी बिबट मादी जेरबंद करण्यात आली होती त्याची ही आई असल्याचे वनखात्याच्या वतीने सांगण्यात आले आहे. काल जेरबंद झालेल्या मादीच्या बाजूला दोन बिबट्यांची तिला सोडण्यासाठी प्रयत्न चालू होते.त्यापैकी हि एक असून अजून एक बिबट असल्याचे स्थानिक रहिवासी सांगत आहेत त्या मादीला उपवनसंरक्षण प्रशांत खाडे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक ज्ञानेश्वर पवार .. आपदा मित्र मास्टर ट्रेनर सुशांत भुजबळ रेस्क्यू टीम सदस्य रामकृष्ण चोपडा तुषार टेके ग्रामपंचायत सदस्य उदय खंडागळे यांच्या मदतीने सदर बिबट मादीस माणिक डोह बिबट निवारण केंद्र या ठिकाणी नेण्यात आले आहे. दरम्यान बिबट्यांची वाढती संख्या व मानवी हल्ले, पाहता माऊली खंडागळे यांनी तालुका प्रतिनिधी जिल्हाधिकारी व वनविभाग यांनी त्वरित योग्य उपाययोजना कराव्यात अन्यथा शेतकऱ्यांना वेगळा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा दिला आहे